चार दिवसांपूर्वी आरोपी सोहेल खान नामक गुंडाने एका टायपिंग इन्स्टीट्युटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोणताही वाद आणि कारण नसताना चाकूने वार केले. त्या तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला. आता जखमी विद्यार्थ्यावर अकोला शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर रामदासपेठ पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर आरोपी सोहेलने विद्यार्थ्याच्या आईला धमकी दिली. तसेच त्याने जखमी विद्यार्थ्याच्या अकोल्यात शिकत असलेल्या दोन्ही बहिणींना बलात्काराची धमकी दिली.
या प्रकरणी आमदार मिटकरींनी काल रात्री तब्बल तासभर रामदासपेठ पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आमदार मिटकरींनी पोलीस स्टेशन सोडलं. आरोपी गुंड सोहेल खानला रामदासपेठ पोलिसांचं अभय असल्याचा आरोप त्यांनी केला. या धमकीनंतर त्याच्यावर अद्याप गुन्हे दाखल झाले नाहीत.