इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेब सिरिजच्या नावाखाली एका मॉडलचे बोल्ड सीन शूट करून ते पॉर्न वेबसाइटवर अपलोड केले. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित तरुणीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कथित वेब सिरिजच्या कास्टिंग डायरेक्टरला अटक करून त्याची चौकशी केली जात आहे. तो पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये सामील असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

इंदूरच्या धामनोदमध्ये राहणारी तरुणी मॉडलिग करते. तिनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डिसेंबर २०१९मध्ये विजेंद्र नावाच्या एका व्यक्तीने तिला वेब सिरिजमध्ये ‘ब्रेक’ देण्याच्या भूलथापा दिल्या. त्यानंतर त्याच्या फार्म हाऊसवर बोलावलं. तरुणी आपला मित्र कास्टिंग डायरेक्टर मिलिंदसह तिथे गेली. विजेंद्रने आपल्याला वेब सिरिजमध्ये काम देण्याचं आश्वासन दिले होते. बोल्ड थीमवर आधारलेली आहे. त्यासाठी काही इंटिमेट सीन शूट करावे लागतील. त्यातील अश्लील सीन हटवून उर्वरित चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येईल असं त्याने सांगितल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शूट केलेले सीन रिलीज करण्यात आले खरे मात्र, ते तरुणीला सांगितल्याप्रमाणे नव्हते. तिला याबाबत काहीच कल्पना नव्हती, असे तरुणीने सांगितले. अश्लील दृश्ये न हटवता फिल्म पॉर्न वेबसाइटवर रिलीज करण्यात आली. त्यानंतर तरुणीला याबाबत तिच्या ओळखीतल्या एका व्यक्तीने माहिती दिली. ते ऐकून तरुणीला मोठा धक्का बसला. तिला याबाबत माहीत होण्याआधीच हा व्हिडिओ जवळपास ४ लाख लोकांनी पाहिला होता. तरुणीने याबाबत विजेंद्र आणि मिलिंदशी संपर्क साधला असता, त्यांनी टाळाटाळ केली. अखेर तरुणीने सायबर पोलिसांत कास्टिंग डायरेक्टरसह पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली. कास्टिंग डायरेक्टरला पोलिसांनी अटक केली असून, विजेंद्र फरार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here