हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर संतापलेल्या पत्नीने नराधम आरोपीला जाब विचारला. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पत्नीने आरोपीचा मोबाइल घेतला. तेव्हा त्याने तिच्या हातातील मोबाइल हिसकावून घेऊन जमीनीवर आपटला. त्यानंतर नराधम बापाने पुन्हा मुलीशी अश्लील कृत्य केले. पत्नीने जाब विचारल्यानंतर त्याने तिला देखील मारहाण केली. आता मात्र पत्नीचा संताप अनावर झाला. तिने थेट पोलीस स्टेशन गाठून पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम बाप आता पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी बोपोडीतील ३५ वर्षाच्या नराधम बापाला अटक केली आहे. आरोपी हा फिर्यादीचा दुसरा पती आहे.
Home Maharashtra daughter molest by daughter, अडीच वर्षांच्या लेकीसोबत अश्लील चाळे, व्हिडिओही काढले, पुण्यात...
daughter molest by daughter, अडीच वर्षांच्या लेकीसोबत अश्लील चाळे, व्हिडिओही काढले, पुण्यात नराधम बापाचे संतापजनक कृत्य – father gets jail for molesting daughter in pune
पुणे: पुण्यात नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या अवघ्या अडीच वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.