मुंबई शेअर बाजार
– १६ फेब्रुवारीपासून बीएसई सेन्सेक्स १,८५५.५८ अंक किंवा ३ टक्के घसरला
– बीएसई सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ८,३०,३२२.६१ कोटी रुपये घसरत २,६०,००,६६२.९९ कोटी रुपयांवर गेले
शुक्रवारचा बाजार
– सेन्सेक्स १४१.८७ अंकांनी घशरत ५९,४६३.९३ वर बंद झाला.
– दिवसभरातील एका सत्रात सेन्सेक्स २८०.४६ अंकांनी घसरत ५९,३२५.३४ या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.
– एनएसई निफ्टी ४५.४५ अंकांनी खाली येत १७,४६५.८० वर बंद झाला.
– सेन्सेक्सची उभारणी करणाऱ्या ३० कंपन्यांपैकी महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील, टाटा मोटर्स, मारपुती, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टेक महिंद्र आणि भारती एअरटेल यांचे समभाग मोठ्या प्रमाणावर घसरले.
– एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग वधारले.
– बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.१७ चक्के आणि ०.१५ टक्के खाली आले.
– क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये धातू (२.३९ टक्के), कमॉडिटीज (१.१७ टक्के), वाहन (०.९९ टक्के), स्थावर मालमत्ता (०.७० टक्के), एफएमसीजी (०.४० टक्के), पॉवर (०.३८ टक्के) आणि कन्झ्युमर डिस्क्रिशनरी (०.३७ टक्के) हे निर्देशांक घसरले.
– ऊर्जा, आरोग्यनिगा, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू या क्षेत्रीय निर्देशांकांना फायदा झाला.
आंतरराष्ट्रीय स्थिती
– आशियामध्ये दक्षिण कोरिया, चीन व हाँगकाँग येथील शेअर बाजार पडले.
– जपानचा शेअर बाजार वधारला.
– युरोपातील शेअर बाजार दुपारच्या सत्रापर्यंत वधारले होते.
– गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजार वधारले होते.
– आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेन्ट क्रूडचा दर प्रतिबॅरल ०.९२ टक्के वधारत ८२.९७ डॉलर झाला.
– विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी १,४१७.२४ कोटी रुपयांचे समभाग विकल्याचे स्पष्ट झाले आहे.