पुणे : राजस्थानला एक विवाह सोहळ्यात तरुण आणि एका अल्पवयीन तरुणीची ओळख झाली. त्या ओळखीत तरुणाला एकतर्फी प्रेम झालं. त्यानंतर तरुणाने सातत्याने त्या अल्पवयीन मुलीला फोन मेसेज करत प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यासोबत तरुण राजस्थानचा स्थायिक असून त्याने पुण्यात येऊन तरुणीचा पाठलाग देखील केला. मात्र, या प्रेमसंबंधाला तरुणीने नकार दिल्याने तरुणाने थेट अॅसिड फेकण्याची धमकी दिली. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात संबंधीत आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या २२ वर्षीय बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीची अल्पवयीन बहीण आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहे. त्यांची एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यात राजस्थान येथे भेट झाली होती. तेव्हापासून आरोपी पीडित मुलीला फोन करून प्रेम संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता. त्याचे फोन पीडितेने न उचलल्याने आरोपीने पुण्यात येऊन पीडितेच्या राहत्या घराजवळ आणि शाळेच्या परिसरात पाठलाग केला.

अमित शहांच्या कार्यक्रमातून परतताना भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन बस उलटल्या, ८ ठार, १२ जखमी
तर फिर्यादी तरुणी नोकरी करत असलेल्या ठिकाणीही आरोपी पाठलाग करत होता. फिर्यादी तरुणी आणि तिची बहीण या आरोपीसोबत फोनवर बोलण्यास किंवा त्यास भेटण्यास नकार देत असल्याने, आरोपीने दोन्ही बहिणींना अंगावर अॅसिड फेकून त्यांचे जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. त्यामुळे अखेर तरुणीने पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकारी सपना वाघमारे करत आहेत.

औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा घोळ, शहर की जिल्ह्याचं नाव बदललं, देवेंद्र फडणवीसांनी तपशीलवार सांगितलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here