हैदराबाद : आंध्र पदेशात करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. या दरम्यान दारुच्या दुकानांवर पूर्णत: बंदी कायम आहे. त्यामुळे अनेक जण चोरून लपून दारु मिळवण्यासाठी दुप्पट किंमत मोजण्यासही तयार आहेत. तर अनेक जण दारु न मिळाल्यानं आपलं आयुष्यही पणाला लावताना दिसत आहेत. आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात दारु न मिळाल्यानं काही जणांनी केल्यानं नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.

शुक्रवारी पोलिसांनी या घटनेची माहिती दिलीय. मृतांपैंकी तीन जणांचा मृत्यू गुरुवारी झाला होता तर शुक्रवारी सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय.

वाचा :

वाचा :

लॉकडाऊनमुळे शहर आणि आसपासच्या भागातील दारुची दुकानं गेल्या १० दिवसांपासून बंद आहेत. मात्र, दारुचं व्यसन जडलेल्या अनेकांसाठी ही बंदी जीवघेणी ठरतेय. नऊ मृतांमध्ये तीन भिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील दोन जण इथल्या एका स्थानिक मंदिरात भिक मागत होते. गुरुवारी अचानक पोटात दुखू लागल्यानं त्यांना दारसीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इथं उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अन्य एक व्यक्ती दारु न मिळाल्यानं घरातच पिऊन बेशुद्ध अवस्थेत सापडला. रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेतानाच त्यानं प्राण सोडला. तर सहा जणांचा मृत्यू शुक्रवारी सकाळी रुग्णालयात उपचारा दरम्यान झाला. मृतांमध्ये २५ वर्षांच्या तरुणापासून ते ६५ वर्ष वयांच्या व्यक्तींचा समावेश आहे. शहरात आणखीही असे काही मृत्यू झाले आहेत का? याबद्दल पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

वाचा :

वाचा :

पोलीस अधिक्षक सिद्धार्थ कौशल यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. अनेक ठिकाणांहून सॅनिटायझर्स जप्त करण्यात आलेत. मृतांनी केवळ सॅनिटायझर प्राशन केलं की त्यात आणखीन काही रसायनं मिसळण्यात आली होती, याचीदेखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येतेय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here