अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात असलेल्या नामांकित जे. डी .पाटील महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील जेनपुर येथे राष्ट्रीय सेवा शिबीर सुरू होते. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या शिबिराचा आज शेवटचा दिवस होता. शिबीर संपल्यानंतर सर्व विद्यार्थी कॉलेजच्या वतीने भाड्याने घेतलेला ट्रॅक्टर करून दर्यापूरकडे निघाले.
विद्यार्थी हे ट्रॅक्टरने दर्यापूरच्या दिशेने येत असताना जेणपुर येथे ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो तोल जाऊन पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर मधील सुमारे २५ ते ३० विद्यार्थी हे गंभीर जखमी झालेले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आता तातडीने अमरावती येथे हलविण्यात आले आहे.
हल्ला झालेले शहराध्यक्ष सचिन भोसलेंची आदित्य ठाकरेंनी घेतली रुग्णालयात जाऊन भेट
हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांचे आई-वडील व नातेवाईक यांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे. काही वेळ तणावाचे वातावरण सुद्धा हॉस्पिटलमध्ये निर्माण झालेले होते. घटनास्थळी दर्यापूर पोलीस दाखल झाले असून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु महाविद्यालयाच्या वतीने या निष्क्रिय कारभाराचा आता विद्यार्थ्यांचे नातेवाईकांकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे. महाविद्यालयाकडून अशा निष्क्रिय कारभाराविरोधात आता वरिष्ठ पातळीवर अधिकारी दखल घेणार काय हे पाहणे योग्य ठरणार आहे.
पाहा व्हिडिओ :