मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात भारतीय अब्जाधिशांसाठी चांगली झाली नाही. गौतम अदानी याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, ज्यांनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाची मोठी किंमती मोजली आहे. २०२३ वर्षाचा दुसऱ्या महिन्याला (फेब्रुवारी) निरोप देण्याची वेळ आली असताना आतापर्यंत सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्यांच्या यादीत भारतीय अब्जाधीशांनी अव्वल स्थान पटकावले आहे. गौतम अदानी आतापर्यंत सर्वाधिक संपत्ती गमावणार आघाडीचे व्यक्ती ठरले आहेत तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याही संपत्तीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

पण आणखी एक भारतीय अब्जाधिश राधाकिशन दमानी यांनाही यावर्षी मोठा झटका बसला आहे. आतापर्यंत या वर्षी सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्यांच्या यादीत राधाकिशन दमानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ज्येष्ठ गुंतवणूकदार राधाकिशन दमानी रिटेल टेन डीमार्टचे संस्थापक आहेत.

शेअर बाजारात अदानी समूहाला धक्क्यावर धक्के, आता सर्वोच्च न्यायालयाचाही झटका; पाहा काय म्हटले
दमानी यांनीही कोट्यवधी गमावले
डीमार्टचे संस्थपाक आणि शेअर बाजारातील ज्येष्ठ गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्याही नेटवर्थमध्ये या वर्षी आतापर्यंत मोठी घट झाली आहे. १ जानेवारीपासून आतापर्यंत दमानी यांचे सुमारे २.६७ अब्ज डॉलर ( तब्बल२२,१४३ कोटी रुपये) बुडाले आहेत. अशाप्रकारे आपल्या एकूण संपत्तीत झालेल्या या घसरणीमुळे दमाणी सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्यांच्या यादीत सामील झाले आहेत. पण २०२३ मध्ये सर्वाधिक संपत्ती गमावलेल्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत दमानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

चीनचं कंबरडं मोडणार, भारत आर्थिक महासत्ता बनणार… ‘डॉक्टर डूम’च्या भविष्यवाणीने उडाली ड्रॅगनची झोप
दमानी यांची नेटवर्थ घटली
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या ताज्या माहितीनुसार लाखो कोटींच्या नुकसानीमुळे दमानी यांची एकूण संपत्ती १६.७ अब्ज डॉलर इतकी राहिली असून जगातील श्रीमंतांच्या यादीत ते ९७व्या क्रमांकावर आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून दमानी यांनी एकूण १४% संपत्ती बुडाली आहे. मुंबई बेस्ट अब्जाधीश राधाकिशन दमानी रिटेल चेन डी-मार्टचे संस्थापक तसेच अनुभवी गुंतवणूकदार आहेत आणि त्यांना दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुंझुवाला यांचे गुरू देखील म्हटले जाते. देशभरात २३८ ठिकाणी डीमार्ट स्टोअर्स सध्या सुरु आहेत.

Adani शेअर्सची बत्ती गुल! महिन्याभरात घसरणीने सर्वच रेकाॅर्ड मोडले, सर्वात वाईट कामगिरीचा शिक्का
गौतम अदानींची आघाडी
गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये जगभरातील श्रीमंतांमध्ये सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम करणारे भारतीय दिग्गज गौतम अदानी यांनी यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक संपत्ती गमावली आहे. २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी ते श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते, पण महिन्याभरात ते टॉप २० मधून बाहेर पडून आता ३० व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. या वर्षी आतापर्यंत त्यांना ८०.६ अब्ज डॉलरचे मोठे नुकसान झाले आहे.

मुकेश अंबानींनी किती गमावलं?
रिलायन्सचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांना २०२३ मध्ये आतापर्यंत झालेल्या तोट्याबद्दल बोला दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी $५.३८ अब्ज (सुमारे ४४,६१८ कोटी रुपयांपेक्षा जास्त) तोटा सहन करावा लागला आहे. ब्लूमबर्गनुसार अंबानी $८१.७ अब्जच्या नेटवर्थसह टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत १०व्या स्थानावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here