आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील कृष्णा लंबे आणि जुन्नर तालुक्यातील सायली ताजने यांचा मंचर येथे विवाह सोहळा पार पडला. मात्र, हा लग्न सोहळा पडताना एक करार करण्यात आला. या करारामध्ये सहा प्रश्न ठेवण्यात आले होते. ते मान्य झाल्यानंतर हा विवाह पार पडला. विशेष म्हणजे या करारनाम्यवर साक्षीदार म्हणून त्यांच्या मित्र आणि मैत्रिणींनी सह्या देखील केल्या आहेत. लग्नाच्या बंधनात अडकताना नवदाम्पत्यानं एकमेकांच्या अटी करारनाम्यात ठेवल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हा विवाह केला आहे. या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा रंगू लागली आहे.
“लग्नाचा करारनामा”
* कृष्णा : सायलीचे म्हणणे नेहमी बरोबरचं असेल…!
* सायली : मी कृष्णाकडे शॉपिंगसाठी हट्ट धरणार नाही…!
* सायली : मी कृष्णाला मित्रांबरोबर फिरायला, पार्टीला जायला आडवणार नाही. (महिन्यातून दोन वेळा)
* कृष्णा : मी सायलीची आणि आई वडिलांची ही सेवा करेल…!
* सायली : मी कृष्णाचे मित्र घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल…!
* आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एक दिवसात मिटवू.
या सहा अटींवर या दाम्पत्यानं एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सहा अटी आणि त्यानंतर झालेला हा विवाह सोहळा सद्या चर्चेचा विषय ठरत आहे.
वधूसाठी लग्नाची मिरवणूक घेऊन वर हॉस्पिटलमध्ये पोहोचला, बेडलाच बनवले मंडप!