अजमेर: राजस्थानच्या अजमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वैयक्तिक वादातून एका व्यक्तीनं पुतण्यावर गोळी झाली. ही घटना सोशल मोबाईलमध्ये कैद झाली. त्यानंतर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अजमेरमधील गुजरानमध्ये ही घटना घडली. ३५ वर्षांच्या हमीद काठात उर्फ मेहबूबचा त्याच्या काकांशी जमिनीवरून वाद सुरू होता. २३ फेब्रुवारीला दोघांचं शेतात भांडण झालं. हमीद संध्याकाळी शेतात गेला होता. त्यावेळी त्याला काका शेतातील माती ट्रॉलीत भरताना दिसले. हमीद त्यांच्या जवळ गेला आणि विरोध करू लागला. त्यावरून काकांनी त्याच्यावर थेट बंदूक रोखली.
समुद्र किनारी सापडला भलामोठा गोळा, संपूर्ण बीच केला रिकामा; परिसरात खळबळ, अखेर रहस्य उलगडलं
काका मस्करी करत असल्याचा हमीदचा समज होता. त्यामुळे तो त्यांना डिवचू लागला. दरम्यान त्यानं खिशातून फोन काढला आणि व्हिडीओ रेकॉर्ड करू लागला. हमीदनं काकांना गोळी मारण्याचं आव्हान दिलं. त्यांना गोळीबारासाठी उद्युक्त केलं. डिवचल्या गेलेल्या काकांनी खरंच गोळी झाडली. गोळी हमीदच्या गुप्तांगावर लागली. त्याला दुखापत झाली. घटनेनंतर आरोपी तिथून फरार झाला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जखमी हमीदला तातडीनं अमृतकौर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रथमोपचारानंतर त्याला डॉक्टरांनी अजमेरला पुढील उपचारांसाठी हलवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३०७ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हमीद आणि त्याचे काका यांच्या शेताजवळ सुरू असलेल्या खोदकामावरून हा संपूर्ण प्रकार घडला. यावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. बाघा काठात असं आरोपीचं नाव असून त्याचं वय ६५ वर्षे आहे.
मला शोधू नका! राज्य सरकारनं इस्रायलाला पाठवलेला शेतकरी अचानक बेपत्ता; अखेर कारण समोर
भरतपूरमध्येही गोळीबार

राजस्थानच्याच भरतपूरमधलाही एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात काही जणांनी एका तरुणाला काठ्यांनी मारहाण केली. त्याला अतिशय बेदम मारलं. त्यानंतर त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. तरुणाला जखमी अवस्थेत टाकून आरोपी फरार झाले. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज खूप व्हायरल झालं. गजेंद्र उर्फ लाला गुर्जर असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. अटल बंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here