थिरुअनंतपुरम: गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये ३१ वर्षांच्या अनुप एम. यांना २५ कोटी रुपयांची लॉटरी लागली. लॉटरी लागल्यानं रिक्षा चालवणारे अनुप एका रात्रीत कोट्याधीश झाले. त्यांचं नशीब रातोरात बदललं. लॉटरी लागल्यापासून अनेक नातेवाईक, मित्र मंडळी, अनोळखी लोक अनुप यांना संपर्क करू लागले. आर्थिक अडचणी मांडू लागले. त्यांच्याकडे गाऱ्हाणी घालत पैशांची मागणी करू लागले. या सगळ्याला अनुप प्रचंड वैतागले. यापेक्षा लॉटरी लागली नसती, तर बरं झालं असतं, असं अनुप वैतागून म्हणाले होते.

आजच्या घडीला अनुप राज्य सरकारच्या लॉटरी व्यवसायाचा एक भाग आहेत. केरळमधील एकमेव कोट्यधीश लॉटरी एजंट अशी त्यांची ओळख आहे. लॉटरी लागण्याआधी अनुप रिक्षा चालवायचे. सध्या ते लॉटरीच्या कामात व्यग्र आहेत. लॉटरीची तिकिटं विकण्यासाठी त्यांची दिवसभर फोनाफोनी सुरू असते. अनुप यांनी लॉटरी व्यवसायासाठी एम. ए. लकी सेंटर नावानं दुकान उघडलं आहे. त्यांचा आयफोन सतत वाजत असतो. कारण ग्राहकांकडून त्यांना सतत फोन येत असतात.
दोघांत तिसरा आला अन् जीव गेला; ट्रेनमधील बॉडीचं गूढ ९ दिवसांनी उकलले; पेटीमुळे आरोपी अडकले
केरळच्या लॉटरी इतिहासातील सर्वात मोठे विजेते अशी अनुप यांची ओळख आहे. काही आठवड्यांपूर्वी ते इकडे तिकडे फिरत होते. लोकांपासून शक्य तितके दूर पळत होते. आर्थिक मदत मागण्यास येणाऱ्यांना टाळण्याचं कसब त्यांनी शिकून घेतलं आहे. लॉटरी लागल्यानंतर अनुप यांनी सातत्यानं त्यांचा पत्ता बदलला. ते सतत मुक्कामाचं ठिकाण बदलत राहिले. घराला गरजूंचा गराडा पडू नये यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.

आता परिस्थिती बदलली आहे. अनुप यांची गाडी रुळावर आली आहे. अनुप यांच्या हातात सोन्याचं मोठं ब्रेसलेट, गळ्यात सोन्याची चेन आहे. मात्र आजही आपल्याला अनेकांची पत्र येतात, खूप जण आर्थिक मदतीची मागण करतात, असं म्हणत अनुप यांनी त्यांना आलेलं पत्राचं बंडल काढून दाखवलं. आजही काही जण दुकानात येऊन करतात. मी प्रयत्न करतो, असं अनुप यांनी सांगितलं.
मला शोधू नका! राज्य सरकारनं इस्रायलाला पाठवलेला शेतकरी अचानक बेपत्ता; अखेर कारण समोर
पाच महिन्यांपूर्वी कोट्याधीश झालेले अनुप आता केरळ सरकारच्या लॉटरी व्यवसायाचा चेहरा झाले आहेत. केरळ सरकारचा लॉटरी व्यवसाय आता दररोज एकाला कोट्याधीश करत आहे. केरळ लॉटरी विभागात एक लाखाहून अधिक अधिकृत एजंट आहेत. त्यांच्या खाली अनेक उपएजंट आणि फेरीवाले आहेत. या माध्यमातून राज्यातील लाखो लोकांना रोजगार मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here