सूरत: गुजरातच्या सूरत शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. फोर्ड इको स्पोर्ट्सनं एका चिमुकलीला चिरडलं. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शहरातील गोडादरा परिसरात असलेल्या शिव सागर रेसिडन्सी सोसायटीत ही घटना घडली.

इमारतीजवळ तीन मुलं सायकल घेऊन उभी होती. शेजारीच एक महिला आणि पुरुष वाळू उचलत होते. तितक्यात तिथे दोन वर्षांची प्रिंजल आली. काही वेळ मुलांसोबत थांबल्यानंतर प्रिंजल पुढे चालत गेली. तितक्यात तिच्या डाव्या बाजूनं एक इको स्पोर्ट्स कार आली. कार उजव्या बाजूला वळली. प्रिंजल कारच्या पुढच्या चाकाखाली आली.
उगाच २५ कोटींची लॉटरी लागली! रिक्षावाला प्रचंड वैतागला; घर सोडून भटकत राहिला; आता काय करतो?
कारनं चिमुकलीला चिरडल्याचं पाहताच एक महिला कारच्या दिशेनं धावत आली. कारखाली मुलगी आल्याचं तिनं चालकाला सांगितलं. त्यानंतर चालक कारमधून उतरला. तितक्यात आणखी काही जणांनी कारजवळ धाव घेतली. प्रिंजलला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

चिमुकलीला कारखाली चिरडणारा तिचाच काका असल्याचं गोडादरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एम. वसावा यांनी सांगितलं. या प्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
VIDEO: अरे घाल गोळी! पुतण्यानं डिवचलं, काका पेटला; गोळी घातली, बरोबर नको त्या ठिकाणी लागली
काही दिवसांपूर्वी महिसागर जिल्ह्यात एका कारनं वऱ्हाड्यांना धडक दिली. भरधाव कार रस्त्यावर नाचत असलेल्या वऱ्हाडी मंडळींना उडवत गेली. वरात गेस्ट हाऊसजवळ असताना हा प्रकार घडला. वऱ्हाडींचा आरडाओरडा, आक्रोश ऐकून वधूकडची मंडळी धावत बाहेर आली. त्यावेळी रस्त्यावरची परिस्थिती सगळेच सुन्न झाले.

बालानिसोरजवळ रात्री उशिरा ढोलताशांच्या गजरात वरात निघाली होती. वरात गेस्ट हाऊसपर्यंत जाणार होती. गेस्ट हाऊसच्या जवळ येताच एका कारनं वऱ्हाडींना उडवलं. त्यामुळे आनंदाची जागा दु:खानं घेतली. सगळीकडे आक्रोश सुरू झाला. वधूपक्षातील लोक बाहेर आले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here