दिल्ली: व्हिडीओ तयार करण्याच्या नादात दोन तरुणांचा जीव गेला. राजधानी दिल्लीत ही घटना घडली. वंश (२३) आणि मोनू (२०) अशी मृतांची नावं आहेत. व्हिडीओ करण्यात दोघेही इतके मश्गुल झाले की त्यांना रुळांवरून ट्रेन जातात याचाही विसर पडला. व्हिडीओ शूट करत असताना त्यांना ट्रेननं धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळी तरुणांचे मोबाईल सापडले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शाहदरा परिसरातील कांती नगर उड्डाणपुलाजवळ वंश आणि मोनू रेल्वे रुळांवर बुधवारी (२२ फेब्रुवारी) व्हिडीओ चित्रित करत होते. त्याचवेळी ट्रेन आली आणि दोघांना धडक दिली. वंश शर्मा बीटेकचा विद्यार्थी होता. तर मोनू एका दुकानात सेल्समनचा काम करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही कांती नगर एक्स्टेंशनचे रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघांचे मृतदेह जीटीबी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले.
VIDEO: चिमुकली खेळत होती, कारच्या चाकाखाली आल्यानं चिरडून अंत; चालक तिचाच काका निघाला
रेल्वे रुळांवर दोघांचे मोबाईल सापडले. दोन्ही तरुण मोबाईलवर इन्स्टाग्रामवर रील तयार करायचे आणि लाईव्ह व्हिडीओ तयार करण्यासाठी रेल्वे रुळांवर जायचे अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
VIDEO: अरे घाल गोळी! पुतण्यानं डिवचलं, काका पेटला; गोळी घातली, बरोबर नको त्या ठिकाणी लागली
रेल्वे रुळांवर चित्रीकरण करण्याची हौस याआधीही अनेकांच्या जीवावर बेतली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये तेलंगणातील एक घटना बरीच चर्चेत राहिली होती. रेल्वे रुळांवर इन्स्टाग्रामवर रील तयार करत होता. त्यावेळी त्याला रेल्वेनं धडक दिली. हनुमाकोंडा जिल्ह्यात ही घटना घडली. ४ सप्टेंबर रोजी १७ वर्षांचा अक्षय राज रील तयार करण्यासाठी काजीपेट रेल्वे स्थानकाजवळ पोहोचला. अक्षय रेल्वे रुळाच्या बाजूनं जात असताना मागून भरधाव वेगात ट्रेन आली. तिनं अक्षयला धडक दिली. ट्रेनची धडक बसताच अक्षय जागीच कोसळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here