अहमदनगर: ‘दूध प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारची दोन ते तीन वेळा मीटिंग झाली आहे. राज्य सरकार याबाबत लवकरच धोरण ठरवणार आहे. पण जेव्हा एखादा विषय मार्गी लागण्याच्या टप्प्यात असतो, तेव्हा त्या विषयावर आंदोलन करते, अशी टीका आमदार यांनी राज्यातील भाजप नेत्यांनी पुकारलेल्या दूध आंदोलनावर केली. दुधाचा विषय मांडत आहात, तर केंद्र सरकारने जी पंधरा हजार टन दूध पावडर मागितली आहे, त्याचाही मुद्दा मांडा, असा टोलाही त्यांनी लगावला. (Rohit Pawar Criticises BJP Leaders)

आज नगरच्या जिल्हा रुग्णालयात रोहित पवार यांनी भेट देत करोना अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी भाजपने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘एखादा विषय मार्गी लावण्याच्या स्तरावर असेल तेव्हा भाजप आंदोलन करत असते. ही भाजपची सवय आहे. भाजपचे जे नेते महाराष्ट्रात आंदोलन करतात ते केंद्र सरकार दहा ते पंधरा हजार टन दूध पावडर आणत आहे, त्याबद्दल केव्हा आंदोलन करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात तेव्हा तुम्ही शांत बसता, असे सांगतानाच सोयीचे राजकारण भाजपाचे नेत्यांकडून होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकारच्या बाबतीत भाजपने काळजी करू नये. राज्य सरकार हे लोकांच्या हिताचे सरकार असून ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाचा:

विखेंचे वक्तव्य केंद्रातील नेत्यांना चांगले वाटण्यासाठी

भाजपला सल्ला देण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दररोज भूमिपूजन व उद्घाटन करणाऱ्या त्यांचे मंत्री व आमदारांना थांबवावे, असे वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगरमध्ये बोलताना केले होते. त्याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘दिल्लीच्या प्रमुख नेत्यांना चांगले वाटावे यासाठी ते तसे बोलले असतील. मुळात शरद पवार यांनी भूमिपूजन बाबत जे वक्तव्य केले होते, त्याला कारणे वेगळी होती. भूमिपूजनासाठी अयोध्येत गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. गर्दी झाली तर या करोनाच्या काळात तेथे येणारे भाविक आहेत, त्यांना अडचण होऊ शकते, ‘ असेही ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here