nagpur crime latest news, नागपुरात खळबळ! झोपडीच्या वादातून महिलेवर तरुणाचा चाकूहल्ला, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू – nagpur crime a woman lost her life in an attack by a man over a hut dispute
नागपूर : झोपडीच्या वादातून तरुणाने महिलेवर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी महिलेला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. आरती निकोलस (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपी बादल कुंभरे (२८) याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला आणि आरोपी तरुण दहीकर झेंड्याजवळ शेजारी राहतात. शनिवारी दुपारी झोपडीच्या जागेवरून दोघांमध्ये वाद झाला. दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात अनेक गोष्टींवरून वेगवेगळ्या प्रकारचे वाद ही होते, यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणे होत होती. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत. बाप रे! पती-पत्नीने घरामध्ये साठवला कोट्यवधींचा अवैध पदार्थ, पोलिस पथकाचेही विस्फारले डोळे याच वैमनस्यातून शनिवार सकाळपासूनच या दोघांमध्ये भांडणं सुरू झाले. याच दरम्यान आरोपीने घरातून चाकू आणून महिलेवर थेट हल्ला केला. या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली.
अदानींना फारच मोठा दिलासा! एकावर एक बसलेल्या धक्क्यानंतर आता विदेशातून आली गुड न्यूज इमामवाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी मृत महिलेची आई सुमनबाई गवळी या तिच्याजवळच उभ्या होत्या. हल्ल्याच्या वेळी आरोपीनी तिच्यावरही चाकू उगारला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरू आहे.