औरंगाबाद: पावसात भिजून भाषण केल्याने यश मिळत असतं. कदाचित हे पुढचे संकेत असू शकतात. त्यामुळे पाऊस होताच मी उभा राहिलो, असा टोला भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांना नाव न घेता लगावला. त्यामुळे एकच खसखस पिकली

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या झाले. त्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेला संबोधित करताना त्यांनीही टोलेबाजी केली. रावसाहेब दानवे हे भाषणाला उभे राहताच मुसळधार पाऊस सुरू झाला. तरीही त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं. भाषण सुरू असताना पाऊस सुरू झाल्याने तोच धागा पकडत पावसात भिजून भाषण केल्याने यश मिळत असतं. त्यात मिरुग पडला तर नक्कीच यश मिळतं. कदाचित हे पुढचे संकेत असू शकतात. त्यामुळे पाऊस होताच मी उभा राहिलो, अशी कोटी दानवे यांनी केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

अपघात झाल्यास स्टिअरिंग हातात घेऊ

तीन पक्षाच्या हातात तीन स्टेअरिंग आहेत. त्यामुळे त्यांची गाडी कुठपर्यंत चालेल माहीत नाही. राज्याच्या हिताच्या स्टिअरिंग नेहमी एकाच्याच हातात असावं. स्टिअरिंग आमच्या हातात असावं अशी काही आमची अपेक्षा नाही. त्यांनी राज्याच्या हितासाठी काम करावं. राज्याचं भलं करावं. पण आपसातील वादामुळे स्टिअरिंगवरचा हात निसटला आणि अपघात झाला तर स्टिअरिंग आम्ही हातात घेऊ. आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ आणि स्वबळावर लढून सत्ता आणू, असं दानवे म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं दानवे यांनी सांगितलं. सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवाव्यात आणि आपआपली ताकद दाखवावी, असं पाटील म्हणाले होते. मागच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणुका लढवल्या गेल्या आणि निवडून आले. नंतर ज्यांच्यासोबत निवडणुका लढवल्या त्यांच्यासोबत न जाता दगाफटका करून दुसऱ्यांशी संगनमत करण्यात आलं. त्याबद्दल चंद्रकांत पाटील बोलले होते. पण त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, असं ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here