कोल्हापूूर : दोन दिवसांपूर्वी कणेरी मठ येथे सुरू असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा दरम्यान अंदाजे ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप मठाकडून अधिकृत आकडेवारी सांगण्यात आलेली नाही. या गायींचा मृत्यू अन्नातून विषबाधा झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या घटनेचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण घडली. या प्रकरणानंतर सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन त्या घटनेचा निषेध देखील केला. संबंधितांच्या वर पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आला. कणेरी मठातील गायींच्या मृत्यू प्रकरणाबाबत परखड पोस्ट लिहिणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना धमकीचा फोन आला आहे.

कणेरी मठातील गायींच्या मृत्यू प्रकरणात सोशल मीडियातून असंख्य लोकांनी आपल्या तक्रारी आणि निषेध व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुभाष देसाई यांनीही व्हाट्सअप आणि फेसबुकवर आपल्या परखड प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या अनेकांनी शेअर केल्या आणि त्यामुळे महाराष्ट्रभर त्या परखड प्रतिक्रियांचे स्वागत झाले. यानंतर दबाव टाकण्यासाठी त्यांना धमकी वजा फोन आला असल्याचे डॉ. सुभाष देसाई यांनीच म्हटले आहे.

कसब्यात मतदानाच्या आदल्या रात्री ड्रामा, पैसे वाटपावरुन महिलेला मारहाण, भाजप समर्थकांवर गुन्हा दाखल

काल दुपारी पावणे चारच्या सुमारास ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना एक फोन आला. या फोनवर ” मी मालवणचा आहे सांगत महादेव सावंत” असे नाव सांगितले. त्याव्यक्तीनं डॉ. सुभाष देसाईंना फेसबुकवर आमची बदनामी का करता असा प्रश्न विचारला. “मी माझी मते स्पष्टपणे मांडलेली आहेत ती चुकीची असतील तर ती तुम्ही खोडा” असे ही देसाई यांनी त्यांना सुनावले यावर तुम्हाला येऊनच भेटतो, असे संबंधितांनी सांगितले.

LIVE: चिंचवडमध्ये मतदान केंद्रावर राडा, सागर अंघोळकर आणि राहुल कलाटेंचे समर्थक भिडले

मठावरील स्वयंसेवकांकडून पत्रकारांवर हल्ला करणे धमकीवजा फोन येणे याचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख यांना पत्रकारांना मारहाण प्रकरणी निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये महादेव सावंत यांनी जेष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना धमकावल्याची तक्रार ही करण्यात आली असल्याची माहिती आहे.

सुभाष देसाई यांना आलेल्या धमकी प्रकरणाची माहिती घ्यावी अशा सूचना कोल्हापूरच्या जिल्हा विशेष शाखेला देण्यात आल्या आहेत.

खंबीरपणे प्रचार केला, मतदारसंघ पालथा घातला; पण मतदान करताना साहेबांच्या आठवणीने अश्विनी जगताप भावूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here