man dies while playing cricket, बॉलिंगसाठी रनअप घेताना छातीत कळ येऊन कोसळला; क्रिकेटच्या मैदानात आयुष्याची इनिंग संपली – cricketer dies of heart attack on field near ahmedabad
अहमदाबाद: तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढतच चालली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये राज्य वस्तू आणि सेवा कर विभागातील एका वरिष्ठ लिपिकाचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. शनिवारी क्रिकेट खेळत असताना वसंत राठोड (३४) यांच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे ते मैदानातच बसले. थोड्या वेळानं आडवे झाले. हृदयक्रिया बंद पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. भाडज येथील डेंटल कॉलेजच्या मैदानात ही घटना घडली. क्रिकेट खेळताना मैदानात मृत्यू येण्याची ही गुजरातमधील गेल्या १० दिवसांमधील तिसरी घटना आहे.
अहमदाबादमध्ये जीएसटी कर्मचारी आणि सुरेंद्रनगर जिल्हा पंचायत संघात सामना सुरू होता. राठोड यांच्या संघाचं क्षेत्ररक्षण सुरू असताना त्यांची प्रकृती उत्तम वाटत होती. पंचांच्या बाजूनं जात असताना राठोड यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यावेळी त्यांचे संघ सहकारी त्यांच्याजवळ गेले. राठोड यांना सुरुवातीला डेंटल कॉलेजमध्ये नेण्यात आलं. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यानं त्यांना सोला नागरी रुग्णालयात हलवण्यात आसं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती राज्याच्या जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. माझ्या गर्लफ्रेंडला मेसेज का करतोस? प्रियकरानं मित्राला संपवलं; हृदय काढलं, गुप्तांग छाटलं वस्त्रापूरचे रहिवासी असलेले राठोड अहमदाबादमधील जीएसटीच्या मुख्यालयात कार्यरत होते. ते विवाहित होते. आठवड्याआधी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. राजकोटचा रहिवासी असलेला २७ वर्षीय प्रशांत भरोडिया आणि सूरतचा रहिवासी असलेला ३१ वर्षीय जिग्नेश चौहान यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. क्रिकेट खेळत असताना दोघांनाही हृदयविकाराचा झटका आला. उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.