Jadeja should get Vice captaincy – Harbhajan singh, IND vs AUS: तिसऱ्या कसोटीत भारताचा उपकर्णधार कोण? हरभजनने राहुलऐवजी सुचवले या खेळाडूचे नाव – ind vs aus 3rd test harbhajan said ravindra jadeja will get a vice captaincy for border gavaskar trophy indore test
नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने आपल्या उपकर्णधाराची निवड केलेली नाही. याआधीच्या दोन सामन्यांमध्ये केएल राहुल संघाचा उपकर्णधार होता. अशा स्थितीत आता राहुलच्या जागी तिसऱ्या सामन्यात उपकर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे येणार याची चर्चा रंगली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना १ मार्च ते ५ मार्च या कालावधीत खेळवला जाणार आहे.
उपकर्णधाराच्या चर्चांदरम्यान भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगन या जबाबदारीसाठी एका खेळाडूचं नाव सुचवलं आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार हा भारताचा अष्टपैलु खेळाडू रवींद्र जडेजाला बनवावे, असे हरभजनचे मत आहे. हरभजन सिंग म्हणाला, ‘ रवींद्र जडेजा ज्या फॉर्मात आहे आणि ज्या पद्धतीने तो सध्याच्या घडीला खेळत आहे, त्यावरून त्याला संघाचे उपकर्णधारपद देण्यात यावे.’ टीम इंडियाचा ‘लॉर्ड’ नव्या इनिंगसाठी सज्ज, स्वतःच्या हळदीत झिंगाट गाण्यावर थिरकला शार्दूल पुढे तो म्हणाला, ‘जडेजाला यावेळी संघात ही जबाबदारी मिळाली तर तो आणखी चांगली कामगिरी करू शकतो. तो संघातील सिनियर खेळाडूंपैकी एक आहे. याशिवाय जडेजा त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे जिथे तो केवळ त्याच्या गोलंदाजीनेच नव्हे तर फलंदाजीनेही दबदबा निर्माण करत आहे.’
हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू
सध्या जगात रवींद्र जडेजापेक्षा चांगला अष्टपैलू कोणी नाही, असे हरभजनचे मत आहे. तो म्हणाला, ‘जेव्हाही रवींद्र जडेजा मैदानावर असतो, तेव्हा प्रत्येक सामन्यात तो धावा काढेल आणि संघासाठी विकेट काढेल, असे वाटते. तो मॅचविनर खेळाडू आहे. हरभजन सिंग इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला रवींद्र जडेजाच्या बरोबरीचा मानतो. त्यामुळे टीम इंडियाचे उपकर्णधारपद जडेजाला दिले पाहिजे, असे त्याचे मत आहे.