मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नगरच्या दिशेने येणाऱ्या गाडीला पिकअपला टेम्पोची जोरात धडक बसली. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने थेट पिकअप गाडीला धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातात पिकअप मधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. समोरासमोर धडक झाल्याने दोघं वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
पहाटेच्या वेळी हा अपघात झाला असल्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत अपघातात नक्की चूक कुणाची याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.