कोल्हापूर: लग्न म्हटलं की प्रत्येकाला आयुष्यातील एक खास क्षण असतो. लग्नामध्ये अनेक मित्रमंडळी कुटुंब भाऊ-बहीण पाहुणे हजेरी लावतात. लग्नासाठी बराच काळ तयारी होत असते आणि लग्नाच्या दिवशी मित्रमंडळी कडून तसेच पाहुण्यांकडून संगीतसह मौज मजा होत असते. लग्नात अनेक वेळा मित्रांची इच्छा पूर्ण करण्याच्या नादात नवरा नवरीची फजिती झालेल्याचे आपण अनेक व्हिडिओ पाहिले आहे. मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवानं कोल्हापूरमध्ये जे केलं त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मित्रांची डिमांड पूर्ण करण्यासाठी लग्नात नवरदेव जोर आणि बैठका काढत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालत आहे.

कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढरी आणि या कोल्हापुरात प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीमध्ये पैलवान आहेत. दिवसभर तालीम करायची, खुराक घ्यायचा आणि पैलवान व्हायचं, असं असतं. मात्र, कोल्हापुरातील कागल तालुक्यातील बानगे गावात राहणाऱ्या पैलवान अभिजीत सावंत यांचा शुक्रवारी लग्न सोहळा पार पडला. या लग्नात मित्रांनी केलेल्या डिमांड पूर्ण करण्यासाठी अभिजीतने थेट नवरदेवाच्या पोशाखातच सर्वांसमोर स्टेजवरच जोर आणि बैठका मारायला सुरुवात केली.

विखेंचा विरोध मावळला, छत्रपती संभाजीनगरबद्दल मानले आभार, अहमदनगरच्या नामांतराच्या स्वागताची भूमिका

पैलवान नवरदेवाला मित्रांनी लग्नताच जोर बैठका काढण्याची वेळ आणल्याने तेथील काही लोकांनी हा व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडिया वर व्हायरल केला. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये सध्या प्रचंड धुमाकूळ घालत असून हा मजेशीर व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.

LIVE: चिंचवडमध्ये मतदान केंद्रावर राडा, सागर अंघोळकर आणि राहुल कलाटेंचे समर्थक भिडले

कोल्हापूर आणि कुस्तीचं ऐतिहासिक नातं

कुस्ती हा खेळ मराठी मातीतला खेळ म्हणून ओळखला जातो. कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला पाठबळ दिलं. राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग मैदानात विशेष प्रकारचा आखाडा बांधून घेतला. कोल्हापूरमधील अनेक कुस्तीपटू राष्ट्रीय, राज्य पातळीवर चांगली कामगिरी करत असतात. त्यामुळं कोल्हापूरच्या जीवनावर कुस्तीच्या परंपरेचा विशेष परिणाम जाणवतो. याचाच प्रत्यय अनेकदा येत असतो. कोल्हापूर आणि कुस्तीचं नातं कसं आहे ते या लग्नातील नवरदेवाच्या व्हिडिओतून दिसून आलं आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितलं?’; अजित पवार तोंडघशी पडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here