Farmers suicide in Maharashtra | बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानिमित्ताने सरकारचे अपयश पुन्हा एकदा समोर आले आहे.

 

Farmer suicide in Beed
बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

हायलाइट्स:

  • कर्जफेडीसाठी पैसाच उरला नाही
  • डोक्यावर ताण आल्याने आत्महत्येचा निर्णय
  • शेत नापीक झाले होते
बीड: सततची नापिकी, शेतावर येणारे अनेक संकट यातून मार्ग काढताना पैसा उरला नाही. यामध्येच खासगी सावकारासह बँकांचे कर्ज हप्ते कसे फेडणार, या विवंचनेत असलेल्या बीड जिल्ह्यातील रांजणी या गावातील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. बीड जिल्ह्यातील रांजणी येथील शेतकरी अशोक सुखदेव औंढकर यांचे शेत सततच्या नैसर्गिक संकटांमुळे नापीक झाले होते.
आई घराबाहेर पडताच २४ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; डिप्रेशनचं कारण समोर येताच सगळे हादरले
खासगी सावकाराचं कर्ज, बँकेकडून घेतलेले उसने पैसे असा दुहेरी कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर होता. बँक आणि सावकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी सततचा तगादा लावल्याने अशोक औंढकर यांनी जीवन संपवण्याचा मार्ग घेतला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. औंधकर यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली दोन भाऊ आई-वडील आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे. कुटुंबप्रमुख असणाऱ्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर पुढे कुटुंबाचं काय होणार? मुलींचे लग्न मुलाचं लग्न शिक्षण या गोष्टीकडे कोण बघणार?, हे प्रश्न औंधकर कुटुंबासमोर आ वासून उभे राहिले आहेत. अशोक औंधकर यांचा मृतदेह शवाविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंददेखील झाली आहे.
शेतीसाठी कर्ज घेतलं, पण फेडता आलं नाही; हतबल शेतकऱ्याने अखेर परिस्थितीपुढे हात टेकले अन्
मागील काही काळापासून कुठेतरी शेतकरी आत्महत्या सत्र हे थांबलेलं पाहायला मिळालं होते. मात्र आता पुन्हा एकदा कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायला मिळत आहेत. याची अनेक कारणे आहेत. खासगी सावकारांचे कर्ज तर दुसरीकडे बँकांचे कर्ज फेडण्यासाठी हप्ते भरण्यासाठी नेहमीचा तगादा आणि यामध्ये शेतात पीकाचे नुकसान होणे, यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडतात. या समस्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे शिक्षण, लग्नाच्या समस्या निर्माण होतात. मात्र, यानंतरही सरकारकडून शेतकऱ्यांच्या व्यथांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा अनुभव आहे. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. शासन आणि प्रशासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी निघालेल्या कर्ज योजनायाच शेतकऱ्यांच्या मुळावर आल्याचं पाहायला मिळत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here