म. टा. विशेष प्रतिनिधी, : शिवारात मुरूम काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून ३ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. यात दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. तालुक्यातील दयानंद नगर तांडा शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली.

प्रतीक्षा मधुकर पवार (वय १२), ओंकार राजूदास पवार (वय १२) आणि अंजली संतोष राठोड (वय १३) अशी मृत मुलांची नावे आहेत. ही मुले गुरुवारी दुपारी शिवारात फिरत फिरत गेली होती. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला मुरूम काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील कोळसूर येथील दयानंदनगर तांडा शिवारात ही घटना घडली आहे. लॉकडाउनच्या काळात पुणे येथून गावाकडे आलेली प्रतीक्षा आणि तिच्यासह ओंकार आणि अंजली हे गुरुवारी दुपारी गावातील रस्त्याने फिरत फिरत शिवारात पोहोचले. तेथे रस्त्याच्या कडेला राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूम काढण्यासाठी खड्डा खोदला होता. या खड्ड्यात पाणी साचले होते. त्यात हे तिघेही पडले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, बीट अंमलदार वाल्मिक कोळी आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेने उमरगा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here