आज सकाळी कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. कसब्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सकाळी ७ वाजता मतदान करून आपला हक्क बाजवला आहे, त्यासोबत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी देखील नुमवि शाळेत जाऊ मतदान केलं आहे. मात्र, हेमंत रासने मतदान करत असताना त्यांनी गळ्यात भाजपचं चिन्ह असलेलं मफलर परिधान केलं होतं. त्याच मफलवर बोट ठेवत रुपाली पाटील यांनी रासनेंना सावल केला आहे. त्यासोबत निवडणूक आयोगाला देखील कारवाईची मागणी केली आहे.
रासने यांनी जाणीव पूर्वक मतदान केंद्रामध्ये गळ्यात भाजपचा मफलर घालून आत मध्ये जाऊ मतदान केलं हा आचारसंहिताचा भंग आहे. त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल झाला पाहिजे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही सकाळी मतदान केलं. परंतु, त्यांच्या गळ्यात कोणताही मफलर नव्हता म्हणून रवींद्र धंगेकर यांनी आचारसंहितेच पालन केल आहे. तर, हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्यानं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.
या सोबत रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या स्टोरीबद्दल खुलासा केला आहे. अजून मतदान केलं नसून एका कार्यकर्त्यानं पाठवलेला फोटो पोस्ट केल्याचं रुपाली पाटील म्हणाल्या.