जयपूर: राजस्थानात सध्या एका लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. एका व्यावसायिकानं मुलीला लग्नात २ किलो सोनं आणि १०० किलो चांदीचे दागिने आणि वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. यामध्ये चांदीची भांडी, चांदीचा पलंग, सोफा-सेट आणि डायनिंग टेबलचा समावेश आहे. इतकंच नव्हे, तर उद्योगपती पित्यानं लेकीला कोट्यवधींच्या अन्य वस्तूही दिल्या आहेत. त्यामुळे या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे.
उद्योगपती महेंद्र सिंह यांनी वंशिकाला २ किलो सोन्याचे दागिने, १०० किलो चांदीचे दागिने, फर्निचर, भांडी, एसयूव्ही कार, बंगला भेट म्हणून दिला. चांदीची भांडी, चांदीचा पलंग सोफा सेट आणि डायनिंग टेबलही लेकीला वडिलांनी भेट म्हणून दिला. यासोबतच सोन्याचे ३ किलो अन्य दागिनेही दिले. शिवाय एक एसयूव्ही-७०० कार, स्कूटी, बंगळुरूत १२ हजार चौरस फुटांचा कारखाना, ३० बाय ४० चा प्लॉट, पाली हाऊसिंग बोर्डात जमीन आणि १ कोटी ८ लाखांची एफडीदेखील दिली.