नवी दिल्ली : आर्थिक वर्ष संपत आलं आहे आणि या सोबतच कंपन्यांनी पगार वाढीची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे यंदा किती पगारवाढ होणार? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. दरवर्षी काही संस्था सर्वेक्षण करून पगारवाढीबाबत एका अंदाज व्यक्त करतात. यातील एक संस्था प्रोफेशन सर्व्हिस फर्म एऑन इंडियाने अंदाज व्यक्त केला आहे. या वर्षी भारतीय कंपन्या सरासरी १०.३ टक्के पगारवाढ करू शकतात, असं संस्थेने सर्वेक्षणात म्हटलं आहे. जागतिक मंदीची चिंता व्यक्त केली जात असताना चांगली पगारवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे. आपल्याकडील कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याचा कंपन्यांचा मानस असल्याचे एऑनने अंदाजात नमूद केले आहे.

‘२१.४ टक्क्यांची कर्मचारी उलाढाल, टॅलेंट स्ट्रॅटजीत बदल आणि पुरवठा साखळीतील मागणीत अंतर निर्माण झाल्याने कंपन्यांना डबल डिजिटमध्ये पगारवाढ (इन्क्रिमेंट) करण्यास प्रोत्साहित केले आहे’, असे एऑन इंडियाने एका अभ्यासात म्हटले आहे.

काही चिंतांमुळे पगारवाढ गुंतागुंतीची

वाढती आर्थिक अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरतेच्या चिंतांमुळे या वर्षी पगारवाढीचे नियोजन अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. भारतीय कंपन्यांनी गेली दोन वर्षे चांगली पगारवाढ दिली. यामुळे काही कंपन्यांवर कर्मचाऱ्यांच्या वाढत्या पगारांमुळे आर्थिक ताण आला आहे. त्याचा कंपन्या सामना करत आहेत. २०२० आणि २०२१ मध्ये करोना संकटामुळे अनेक कंपन्यांनी पगारवाढ केली नव्हती, अशी माहिती एऑन ह्युमन कॅपिटल सोल्यूशन्सचे (भारत) रुपक चौधरी यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली.

४६ टक्के कंपन्या डबल डिजिट पगारवाढीसाठी तयार

जवळपास ४६ टक्के भारतीय कंपन्या डबल डिजिट पगारवाढ देण्यासाठी तयार आहेत. २०२२ मध्ये कंपन्यांनी सरासरी १०.६ टक्के पगारवाढ केली होती, असे एऑनने आपल्या अभ्यासात म्हटले आहे. ४०हून अधिक उद्योगातील १४०० कंपन्यांच्या आकड्यांचे विश्लेषण या अभ्यासात करण्यात आले आहे. टॉक्नॉलॉजी प्लॅफॉर्म आणि उत्पादनाशी संबंधित कंपन्या या वर्षी सरासरी १०.९ टक्के पगारवाढ करतील. हुशार कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाऊ नये, यावर कंपन्यांचा भर असल्याचे एऑनच्या अभ्यासात म्हटले आहे.
करदात्यांनो, तुमचे पॅन कार्ड ॲक्टिव्ह आहे का? तपासण्यासाठी फॉलो करा ही सोपी प्रोसेस
फ्लिपकार्टमधील ३० टक्के कर्मचाऱ्यांची पगारवाढ नाही

एकीकडे पगारवाढीची गुड न्यूज असताना दुसरीकडे पगारवाढ न करण्याचेही वृत्त समोर आले आहे. फ्लिपकार्ट कंपनीतील उच्चपदावरील ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या वेतना वाढ करणार नाही. कंपनीची विद्यमान आर्थिक स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा ४५०० कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी म्हणजे ग्रेड १० आणि त्यावरील उच्चपदावरील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणार नाही.
Success Story: उधारीच्या पैशांनी कंपनीचा पाया घातला, आज FMCG क्षेत्रात धुमाकूळ घालतेय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here