youth collapses while dancing on dj in nanded, VIDEO : डीजेच्या तालावर नाचता नाचता तरुण कोसळला, जागीच मृत्यू; धक्कादायक घटना – youth collapses while dancing on dj in nanded
नांदेड : जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शिवणी येथील मुत्यम जानगेवाड हा १८ वर्षीय तरुण डीजेच्या तालावर नाचत होता. यावेळी तो अचानक खाली कोसळला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
हा तरुण तेलंगण राज्यातील म्हैसाजवळील पारडी या गावी गेला होता. २४ फेब्रुवारीला लग्न समारंभानंतर २५ तारखेला संध्याकाळी ७ वाजेच्यावेळी रिशेप्सन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डीजे लावण्यात आला होता. या डीजेवर नाचत नाचत हा तरुण अचानक खाली कोसळला. या घटनेत मुत्यम जानगेवाड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या तरुणाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला, अशी माहिती आहे. या दुर्दैवी घटनेने शिवणी गावात हळहळ व्यक्त होत आहे.