नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत मामा-भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नराधम मामाने आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन भाचीचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित भाचीच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मामाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने आपल्या १७ वर्षीय भाचीवर अश्लील कृत्य केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. नात्यातील निर्दयी सख्या मामानेच हे दुष्कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पीडितेच्या नातेवाईकाने या नराधम मामाची पोलिसात तक्रार दाखल केली. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी द्वारका श्रीराम अरखेल (३५) याला अटक केली. आरोपी मामा याला दारूचं व्यसन असल्याची माहिती आहे.

आंबा बागायतदार फवारणी पंपाचा वॉल आणायला गेला इतकेच निमित्त, क्षणात होत्याचे नव्हते झाले
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची बऱ्याच दिवसांपासून अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेऊन होता. २० फेब्रुवारी रोजी तरुणीला एकटी पाहून घरी आल्यानंतर त्याने तिला बळजबरीने घरी नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलीने आरोपीला विरोध केला. यानंतर आरोपीने कोणाला सांगितले तर मी तुझा जीव घेईन अशी जीवे मारण्याची धमकी दिली. मामाची धमकी ऐकून मुलगी घाबरली आणि तिने कोणालाही काहीही सांगितले नाही. आरोपीचे यामुळे मनोबल वाढले आणि आई-वडील घरी नसताना तो घरी येऊन अश्लील कृत्य करू लागला.

नागपुरात खळबळ! झोपडीच्या वादातून महिलेवर तरुणाचा चाकूहल्ला, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
सततच्या छेडछाडीला कंटाळून पीडितेने हा सगळा प्रकार आईला सांगितला. यानंतर तरुणीने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध कलम ३५४ भादवि , ८,१२ पोक्सो, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बाप रे! पती-पत्नीने घरामध्ये साठवला कोट्यवधींचा अवैध पदार्थ, पोलिस पथकाचेही विस्फारले डोळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here