Uddhav Thackeray, ठाकरे सरकार फडणवीसांना अटक करणार होते, त्या योजनेचा मी साक्षीदार; एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा – cm eknath shinde has made a sensational claim that he was a witness to the plan of the thackeray government to arrest fadnavis
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी भाजप नेते गिरीश महाजन यांना अटक करण्याच्या योजनेचा मी साक्षीदार असल्याचे शिंदे म्हणाले. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी हा खळबळजनक दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे सरकारने आपल्याला अटक करण्याची योजना आखल्याचा दावा केला होता. मात्र, त्यावेळी गृहमंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना अटक करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या योजनेचा मी साक्षीदार होतो. महाजन यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ लावण्याची योजनाही सरकारने आखली. ती योजना रोखण्यासाठी मी काय म्हणालो होतो त्याचा पुनरुच्चार करू शकत नाही.’ राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, आपत्तीग्रस्तांना मिळणाऱ्या मदतनिधीत वाढ, वाचा संपूर्ण यादी उद्धव सरकारचा भाजपविरोधात मोठा कट होता : शिंदे
मी तो निर्णय तर बदललाच, पण नंतर संपूर्ण सरकार पाडले आणि त्यांना घरी बसवले. भारतीय जनता पक्षाला (अटकेद्वारे) मागे ढकलण्याची योजना होती, असे शिंदे पुढे म्हणाले. सध्याचे सरकार या कटात सहभागी असलेल्यांवर कारवाई का करत नाही, यावर शिंदे म्हणाले की, त्यांना सत्तेतून बेदखल करणे हे पुरेसे आहे. अशा गोष्टींमध्ये कोणाचा सहभाग होता हे मला चांगलेच माहीत आहे. आवश्यकता भासल्यास आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू करू.
तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार आपल्याला अटक करण्याचा विचार करत होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनीही केला होता. मात्र, त्यावेळी गृहमंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला. सध्या फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी आहे, तर महाजन हे राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री आहेत. Breaking : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळाप्रकरणी अटक, केजरीवालांना मोठा धक्का
Read information now. Read information now.
when will viagra become generic
Read information now. earch our drug database.
Everything what you want to know about pills. Get here.
https://viagrapillsild.com/
Get warning information here. earch our drug database.