पोलादपूर : कोकणात दिवसेंदिवस दारूच्या नशेत आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढू लागला आहे रायगड जिल्हयात दोन दिवसापूर्वी झालेल्या आत्महत्येनंतर आज पुन्हा एक दारूच्या नशेत आत्महत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दारूच्या नशेत पुन्हा एका ५५ वर्षीय इसमाने घेतला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलादपूर तालुक्यातील माटवण येथील घटना घडली आहे.

पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे ५५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेबाबत हाती आलेल्या अधिक माहितीनुसार, मयत राजेश पांडुरंग गायकवाड यांना दारूचे व्यसन होते व त्यांनी नैराश्यपोटी शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान आपल्या घरामध्ये साडीच्या गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

ठाकरे सरकार फडणवीसांना अटक करणार होते, त्या योजनेचा मी साक्षीदार; एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा
तालुक्यात दारू पिऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले

तालुक्यामध्ये दारू पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. घटनास्थळी पोलादपूर पोलीस पथक दाखल झाले होते. याप्रकरणी मृतदेहाचा पोलादपूर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला होता. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलादपूर पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवांलदार रुपेश पवार करीत आहेत.

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, आपत्तीग्रस्तांना मिळणाऱ्या मदतनिधीत वाढ, वाचा संपूर्ण यादी
कोकणात दिवसेंदिवस दारू पिऊन व्यसनाधीन लोकांचं आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढू लागला आहे ही बाब चिंताजनक आहे. रायगड जिल्ह्यातही दोन दिवसापूर्वी असाच एक आत्महत्या करण्याचा प्रकार घडला होता. रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या १५ दिवसांत दारू पिऊन एक ते दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे वाढत चाललेलं व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करावे लागेल दारूमुळे होणारे आत्महत्या हा भविष्यात चिंतेचा विषय करू नये यासाठी पोलीस प्रशासनालाही दारूभट्ट्यांच्या विरोधात तीव्र कारवाई करावी लागेल.

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सूत्र हातात घेतल्यानंतर दारू भट्टयांच्या विरोधात धडक मोहीम राबवली आहे त्याचा मोठा चांगला परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात दिसू लागला आहे तशीच मोहीम रायगड जिल्ह्यातही हाती घेणे आवश्यक असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

Breaking : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळाप्रकरणी अटक, केजरीवालांना मोठा धक्का
रत्नागिरी जिल्हा पोलीस धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात ही मोहीम राबवताना स्वतःचा मोबाईल नंबरच जाहीर करून याबाबत कोणती माहिती असल्यास थेट आपल्याला फोन करा असे आवाहनच केल्यानंतर अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

7 COMMENTS

  1. Read now. Comprehensive side effect and adverse reaction information.
    [url=https://viagrapillsild.online/#]canadian viagra sales[/url]
    Get here. Commonly Used Drugs Charts.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here