मुंबईः ट्युशनसाठी निघालेल्या मुलीला रस्त्यात अडवून सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांना अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. जनेंद्र नगरसिंगराव कोया आणि ऋषिकेश दळवी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघंही सराईत गुन्हेगार आहेत.

२२ फेब्रुवारीरोजी तरुणी ट्युशनसाठी जात असताना तिच्यामागून दोन तरुण चालत होते. त्याचवेळी त्यांनी तिचं ल७ नसल्याचे पाहून गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची चेन खेचली,. भांबावलेल्या तरुणीने विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र ते तिला धक्का देत पळून गेले. या घटनेनंतर तरुणीनी तिच्या आईला घडलेला घटनाक्रम सांगितला. तिच्या आईने तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसात तक्रार नोंदवली होती.

दिवाळीपूर्वीच मुंबईकरांना मिळणार भेट; वेगवान सागरी किनारा मार्ग १ नोव्हेंबरपासून सेवेत
तरुणीने आणि तिच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरांविरोधात ३९२नुसार गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला होता. पोलिसांनी जिथे घटना घडली तिथे जाऊन तपास सुरु केला. तसच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात आरोपींचा चेहरा स्पष्ट दिसत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दोन्ही आरोपींची ओळख तपासल्यानंतर पोलिसांनी तपासकार्याला वेग दिला. सर्व तांत्रिक बाबींचा तपास करुन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. २३ फेब्रुवारी रोजी गोरेगाव परिसरातून दोघांना अटक करण्यात आले.

सायबरचोरांकडून कुरिअरचाही वापर; अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने बनावट संकेतस्थळे
दरम्यान, हे दोन्ही आरोपी सराईत असून यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मालाड, दहिसर, बांगूर नगर आदी पोलिस ठाण्यात घरफोडी आणि लूटीसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जीवघेणी ठरतेय ही नशा; पोलादपूरमध्ये ५५ वर्षीय व्यक्तीने संपवले जीवन, अशा घटना का वाढत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here