यापूर्वीच्या वनडे सामन्यामध्ये त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. पण सामन्यापूर्वीच त्याला दुखापतीमुळे पुन्हा संघाबाहेर जावे लागले. सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT 2023) मध्येही तो संघात परतण्यात अयशस्वी ठरला, जी भारतासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता आगामी हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बुमराहची दुखापत इतकी गंभीर आहे की बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की येत्या काही महिन्यांत तो WTC फायनलसह क्रिकेटचे काही महत्त्वाचे सामनेही गमावू शकतो.
अहवालात पुढे असे सुचवण्यात आले आहे की बीसीसीआयला प्रमुख वेगवान गोलंदाज ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणा-या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त हवा आहे आणि त्यांना त्याच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही कारण तो अजूनही अस्वस्थ आहे. २५ सप्टेंबर २०२२ रोजी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात बुमराह शेवटचा खेळला होता. तेव्हापासून, तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन करत आहे.
मुंबई इंडियन्ससाठी हा एक मोठा धक्का असणार आहे. गेल्या सीझनमध्ये निराशाजनक प्रदर्शनानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स पूर्वीप्रमाणेच पुनरागमन करू पाहणार आहे. पण बुमराहची अनुपस्थिती यात अडथळा ठरू शकते.