वेलिंग्टन: न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. इंग्लंडच्या प्रचंड धावसंख्येनंतर अप्रतिम गोलंदाजीसमोर पहिल्या डावात गुडघे टेकणाऱ्या न्यूझीलंड संघाने चांगलाच पलटवार केला आहे. फॉलोऑन खेळत असलेल्या न्यूझीलंडसाठी माजी कर्णधार केन विल्यमसनने धडाकेबाज शतक झळकावून रॉस टेलर आणि माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुलीसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे सोडले आहे.

विल्यमसन आता न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विलियम्सनने या डावात २८२ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने १८२ धावा करून बाद झाला. हॅरी ब्रूकने त्याला बाद केले, ब्रुकच्या चेंडूवर फॉक्सने विलियम्सनला झेलबाद केले. इंग्लंडविरुद्ध वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विल्यमसनने ट्रेडमार्क शैलीत टेलरच्या ७६८३ कसोटी धावा मागे टाकल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या २०९ धावांत आटोपल्याने त्यांना फॉलोऑन द्यावा लागला. जेव्हा केनने हा विक्रम मोडला तेव्हा टेलरने त्याचे अभिनंदन करत ट्विट केले.

बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, IPL 2023 आणि WTC खेळणार की नाही?
त्याने लिहिले- न्यूझीलंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू बनल्याबद्दल केनचे अभिनंदन. हे यश तुझ्या मेहनतीचे आणि कसोटी क्रिकेटमधील समर्पणाचा पुरावा आहे, जे मी अनेक वर्षांपासून बघत आलो आहे.. रॉस टेलरने शेवटचा कसोटी सामना मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.

गांगुली – सेहवागचा विक्रम

या प्रकरणात केन विल्यमसनने गांगुली-सेहवागला मागे टाकले आहे. केनने २२६ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. या शतकासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३९ शतके ठोकली आहेत. असे करत त्याने या यादीत माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली आणि माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि अॅलिस्टर कुकला मागे टाकले आहे.

तिने प्रयत्नच नाही केले… हरमनच्या रनआऊटने भारतींयाना दिली मोठी जखम; त्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूनं चोळलं मीठ!

विराट कोहलीला देणार धक्का

विल्यमसनच्या नावावर आता २६ कसोटी शतके आहेत. जी न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त आहेत. एवढेच नाही तर सध्याच्या फॅब फोर फलंदाजांमध्ये माजी कर्णधार विराट कोहलीपेक्षा २७ शतकांच्या यादीत विलियमसन फक्त एक पाऊल मागे आहे. जर त्याने या कसोटीत अजून एक शतक झळकावले तर तो विराट कोहलीच्या शतकांची बरोबरी साधू शकतो. तर जो रूटच्या नावावर २९ शतके आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नावावर ३० शतके आहेत. त्यामुळे फॅब फोरच्या शीर्षस्थानी राहण्याची लढत अधिकच रंजक बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here