नवी दिल्ली: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असून अशा परिस्थितीत सोन्या-चांदीच्या खरेदीची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जायचे असेल, तर दोन आठवड्यांपूर्वीच्या तुलनेत आज स्वस्त दर मिळेल. त्यामुळे आज सोने आणि चांदी खरेदीसाठी चांगला दिवस आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे.

निवृत्तीनंतर EPF कडून वाढीव पेन्शन हवीये? खातेधारकांना सोसावे लागेल मोठे नुकसान, काय ते जाणून घ्या
२ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक नोंदवला होता आणि होळीपर्यंत मौल्यवान सोने ५९ हजार आणि नंतर ६० हजारांचा विक्रम मोडेल असे दिसत होते, पण तशी भीती आता कमी होताना दिसत असून वर्षातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक होळीच्या सुमारे एक आठवडाआधीच सोने प्रति दहा ग्रॅम ३ हजार ६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. दरम्यान, जरा तुम्ही आज सोने खरेदीचा विचार करत असाल तर त्यापूर्वी नवीन किमती नक्की तपासून पाहा.

गुड न्यूज! यंदा कंपन्या करणार कर्मचाऱ्यांची मोठी पगारवाढ, बघा किती होईल इन्क्रिमेंट
सोने-चांदीचा भाव
देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) आज सोन्या-चांदीच्या किमती घसरणीसह व्यवहार करत आहेत. सोने स्वस्त झाले असून चांदीची चमकही घसरली आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमती घसरल्यामुळे खरेदीदारांची काही प्रमाणात बचत होईल. एमसीएक्सवर आज सोन्याचा भाव ८७ रूपे किंवा ०.१६ टक्के घसरून ५५ हजार ३४५ रुपये प्रति १० ग्रॅमवर होता. दरम्यान, सोन्याच्या या किमती एप्रिल फ्युचर्ससाठी आहेत आणि आजच्या व्यवहारात ते ५५ आजार २९० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली घसरले होते.

आरबीआयचा देशातील ५ सहकारी बँकांना दणका, महाराष्ट्रातील २ बँकांवर आर्थिक निर्बंध, व्यवहारांवर मर्यादा
दुसरीकडे, आज चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली जात असून किमतीत सुमारे ६०० रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या मार्च फ्युचर्ससाठी या किमती सुमारे १% घसरणीसह व्यवहार करताना सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा दर ५९२ रुपये किंवा ०.९३ टक्क्यांनी घसरून ६२,८४१ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. याशिवाय, आज चांदीच्या घसरणीवर नजर टाकली तर त्याने ६२ हजार ५५० रुपये प्रति किलोच्या नीचांकी पातळी गाठली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here