मुंबई: ‘सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या चौकशीमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील एक युवा मंत्री अडथळे आणत आहेत. त्यांच्या दबावामुळं मुंबई पोलीस या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करू शकत नाहीत,’ असा गंभीर आरोप भाजपचे आमदार व राज्याचे प्रवक्ते यांनी केला आहे. सीबीआयनं तातडीनं हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

वाचा:

सुशांतसिंह याच्या आत्महत्येला महिना उलटून गेला असला तरी या प्रकरणात रोजच्या रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या सर्व बाजू तपासतील, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, सीबीआय चौकशीची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहेत. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतला फसवल्याचा आरोप झाला आहे. सुशांतच्या खात्यातून तब्बल १५ कोटींची रक्कम गायब आहे, असंही तपासात पुढं आलं आहे. हे सगळ्या घडामोडींमुळं या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. राजकीय पातळीवरही याची दखल घेतली गेली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांनी गृहमंत्र्यांना पत्र देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता भाजपनंही या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

फडणवीस यांनी ईडीनं या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली असतानाच आता आमदार भातखळकर यांनी थेट केंद्र सरकारलाच साकडं घातलं आहे. भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ‘राज्यातील पोलीस सुशांतच्या आत्महत्येचा तपास नीट करू शकत नाहीत, अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. राज्य सरकारमधील मुंबईस्थित एक युवा मंत्री या चौकशीत हस्तक्षेप करत आहे. सुशांतच्या बहिणीनंही असाच आरोप केला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

भातखळकर यांनी उल्लेख केलेला युवा मंत्री कोण आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. त्याला उत्तर देताना ‘माझा रोख कोणाकडे आहे हे उघड गुपित आहे,’ असं ट्वीट भातखळकर यांनी केलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here