हाँगकाँग: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती हाँगकाँगमध्ये झाली आहे. एका मॉडेलची तिच्या पूर्वाश्रमीचा पतीनं निर्घृणपणे हत्या केली. ही मॉडेल अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या मृतदेहाचा पाय आणि आणखी काही अवयव एका फ्लटॅमधील फ्रिजमध्ये सापडले. मॉडेलच्या सासरच्या लोकांना अटक करण्यात आली आहे.

२८ वर्षांच्या ऍबी चोई नावाच्या मॉडेलच्या मृतदेहाचे तुकडे शहराच्या वेशीवर असलेल्या एका फ्लॅटमधील फ्रिजमध्ये सापडले. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारंदेखील पोलिसांना तिथे आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांना चोईच्या मृतदेहाचे तुकडे शुक्रवारी सापडले. मात्र अद्यापही तिचं शिर, धड आणि हात सापडलेले नाहीत. पोलिसांना फ्लॅटमध्ये मीट स्लायसर आणि इलेक्ट्रिक करवत आढळून आली.
समुद्र किनारी सापडला भलामोठा गोळा, संपूर्ण बीच केला रिकामा; परिसरात खळबळ, अखेर रहस्य उलगडलं
चोईचा पूर्वाश्रमीचा पती एलन चुंग सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चुंगचे आई, वडील आणि भाऊ यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोईचा चुंग आणि त्याच्या कुटुंबीयांशी आर्थिक वाद सुरू होता. चोई ज्याप्रकारे तिची संपत्ती सांभाळत होती, त्यामुळे काही जण नाराज होते.
विमान हवेत, शिकाऊ पायलट सीटवर; शेजारच्या प्रशिक्षकानं मान टाकली; आधी मस्करी वाटली अन् मग…
चोईचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत फ्रिजमध्ये सापडला. चोईच्या आधीच्या सासरच्या व्यक्तींच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये चोईच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. पोलिसांनी चोईची ओळखपत्रं, क्रेडिट कार्ड आणि घरातील अन्य वस्तूदेखील ताब्यात घेतल्या आहेत. मृतदेहांचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेली उपकरणं पोलिसांना फ्लॅटमध्ये सापडली आहेत. हा फ्लॅट आरोपी एलन चुंगच्या वडिलांनी काही आठवड्यांपूर्वीच भाड्यानं घेतला होता. या फ्लॅटमध्ये मृतदेहाचे काही तुकडे सूपच्या भांड्यांमध्ये आढळून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here