जालना : कांदा म्हटलं की प्रत्येकाच्या स्वयंपाक घरातील राजा आहे. भाज्यांपासून मासाल्यापर्यंत ते थेट कोशिंबीरचा हा अविभाज्य घटक असल्याने जेवणामध्ये कांदा महत्त्वाचा आहे. पण आता कांद्याचे भाव इतके वाढले की सुगरणींच्या स्वयंपाक घरापासून ते हॉटेल व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी येईल. याच कांद्याचे भाव वाढल्यानंतर राज्य सरकारसमोरील अडचणीही वाढतात आणि कांद्याचे भाव गडगडल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी येते.

सध्या नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. पण कांद्याचे दर मात्र गडगडले आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल रविवारी सुमारे २०० क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला ४०० ते ८०० रुपये क्विंटल म्हणजे चार ते आठ रुपये किलोपर्यंतचाच भाव मिळाला. यातून कांद्यावर झालेला खर्च आणि वाहतूक खर्चही निघणे कठीण आहे. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कांद्यातून चार पैसे हाती येतील अशी आशा शेतकऱ्यांना होती.

वाशिमचे खरबूज निघाले काश्मीरला, ३ महिन्यात शेतकर्‍याची कमाल; उत्पन्न पाहून थक्क व्हाल…
कष्टांनी पिकविलेला कांदा चार ते आठ रुपये किलोने ठोक बाजारात आणून विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. दुसरीकडे किरकोळ बाजारात हाच कांदा दहा ते पंधरा रुपये किलोने विक्री केला जात आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते, व्यापाऱ्यांना कांद्यातून नफा होत असून शेतकऱ्यांना मात्र कांद्याचा भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.

किरकोळ बाजारातही कांद्याला दहा ते पंधरा रुपये किलोपर्यंतचा भाव असून जुन्या कांद्याला मात्र किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये किलोपर्यंत मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी ही बातमी खिशाला कात्री लावणारी आहे.

गायींच्या मृत्युबाबत २४ तासानंतर कणेरी मठाचा खुलासा; ५४ गाईंच्या मृत्युचं कारण विचारताच म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here