Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Feb 2023, 1:21 pm
NIA Alert to Mumbai: काही दिवसांपूर्वी मुंबईवर हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर आता एनआयएकडून मुंबईत धोकादायक व्यक्ती असल्याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. सध्या पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

हायलाइट्स:
- मुंबईत घातपाताची शक्यता
- एनआयएकडून मुंबई पोलिसांना हायअलर्ट
एनआयएकडून मुंबई पोलिसांना पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर सरफराज मेमन याचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग परवाना आणि पासपोर्टची प्रतही एनआयएकडून पोलिसांना पाठवण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगाने हालचाली सुरु केल्या असून इंदूर पोलिसांनही याबाबत कळवण्यात आले आहे. एनआयएने पाठवलेल्या कागदपत्रांच्या आधारे मुंबई पोलीस सध्या सरफराज मेमनचा कसून शोध घेत आहेत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शहरातील धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी संस्था याठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच एनआयएकडून मुंबईतील आग्रीपाडा परिसरात छापा टाकला होता. त्यानंतर झालेल्या तपासात एका संशयिताचे नाव समोर आले होते. संबंधित व्यक्ती ज्वेलरीची व्यापारी असून तो चीनमधून माल आयात करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. तेव्हापासून एनआयए या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यानच्या काळात एनआयएला ई-मेलवरुन एक धमकी आली होती. त्यामध्ये मुंबईवर हल्ला होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.