‘घटना घडल्यापासून प्रॉपर्टी क्राईम सेलचे पोलीस दोघांचा शोध घेत होते. तपासातून कोणतेच धागेदोरे हाती लागले नाहीत. मात्र तरीही आम्ही प्रयत्न सुरुच ठेवले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनं शनिवारी आम्हाला दोघांचा ठावठिकाणा समजला. त्यानंतर आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली. दोघांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. घरातून ५५ तोळं सोनं आणि रोकड चोरली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून सोन्याचे दागिने विकले,’ असं दोघांनी पोलिसांना सांगितलं.
आरोपी संतोष मंगार्षी (महिलेचा प्रियकर) यानं नाव बदलून मयांक केशव लांजेकर केलं. तर विवाहित महिलेनंदेखील नाव बदललं. तिचं आधीचं नाव ज्योती मंगेश पाटील होतं. ते बदलून तिनं उन्नती मयांक लांजेकर केलं. यासाठी दोघांनी गॅझेट करून पॅन कार्ड आणि आधार कार्डदेखील तयार करून घेतली. यानंतर दोघे गोकर्ण (कर्नाटक), गोवा, चिपळूण, रत्नागिरी आणि तळोजा येथे राहिले.
gold ornament robbery, लग्न केलं, सुखी संसारात सहा वर्षे सरली; पोलिसांची अचानक धाड पडली; कारण ठरलं ५५ तोळे सोनं – thane married woman boyfriend arrested six years after stealing 55 tola gold from husband’s house
ठाणे: पोलिसांनी एका विवाहित महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या सहा वर्षांपासून पोलीस या दोघांचा शोध घेत होते. ठाणे पोलिसांच्या प्रॉपर्टी क्राईम सेल युनिटनं शनिवारी दोघांना अटक केली. महिला सहा वर्षांपूर्वी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. तेव्हापासून पोलीस तिचा शोध घेत होते. अखेर सहा वर्षांनंतर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.