धाराशीव : काल पासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर एसटीचा एक फोटो खूप व्हायरल होतं आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोद्वारे एसटीची दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फेसबुकवर अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो नेमका कुठला आहे हे समोर आलं आहे. जिल्ह्यातील भूम तालुक्यातील फैजान या व्यक्तीनं हा फोटो काढला आहे. या फोटोतून एसटीची दुरावस्था देखील दिसून येत आहे. एसटीच्या काचा नसलेल्या बसेस, त्यावर करण्यात आलेली जाहिरात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास अशा गोष्टी त्या फोटोत दिसत आहेत. याशिवाय राज्य सरकारकडून करण्यात आलेली जाहिरात देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

ग्रामीण भागातील एसटी बसेसची दुरावस्था

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. एसटीच्या ताफ्यातील बसेसची दुरावस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांचं थकलेलं वेतन असे अनेक प्रश्न सध्या महामंडळापुढं आहेत. राज्य सरकारच्या मदतीनं एसटी महांमडळाच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिक बसेसचा देखील समावेश आहे. नव्या बसेस सध्या शहरातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या बसेसची दुरावस्था आहे. तिचं दुरावस्था या फोटोच्या माध्यमातून समोर आली आहे.

सिकंदर शेखने पटकावला छत्रपती केसरीचा बहुमान, दुसऱ्या मिनिटाला पंजाबच्या पैलवानाला केले चितपट

भूम आगाराची दुरावस्था असलेली बस

एका नागरिकानं हा फोटो टिपला असून त्यांचं नाव फैजान असं आहे. भूम आगाराकडून ग्रामीण भागात दुरावस्था असलेल्या बसेस सोडल्या जातात. बसेसची दुरावस्था या फोटोच्या माध्यमातून दिसून येत आहे. या फोटोतील बसेसच्या खिडक्यांना काचा देखील नसून त्याही स्थितीत ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी त्यातून प्रवास करत असल्याचं दिसतं.

Nagpur : नाईक तलावात आढळले महाकाय कासव, वय १०० वर्षांहून अधिक; VIDEO झाला व्हायरल

दुरावस्था असलेल्या बसवर सरकारची जाहिरातबाजी

भूम आगाराच्या दुरावस्था झालेल्या बसचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. याचं आणखी एक कारण म्हणजे खिडकीच्या काचा निखळून पडलेल्या बसवर राज्य सरकारची निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान ही जाहिरात हे आहे. या बसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसतोय. त्यामुळं सामान्य जनतेतून राज्य सरकारला जाहिरातीसाठी पैसे मिळतात मग एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी, एसटी बसेसच्या खरेदीसाठी आणि एसटी दुरुस्तीसाठी पैसे मिळत नाहीत का असा सवाल केला जात आहे.

शेतकऱ्याच्या नशिबी दु:खच, शासकीय खरेदीसाठी धडपड पण पोलिसांकडून लाठीचार्ज, मायबाप सरकार लक्ष घाला…

थोडक्यात बचावलो,गाडी दरीत गेली असती; घाटात एसटीचा ब्रेक फेल, ४० प्रवासी बसलेले, चालक ठरला देवदूत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here