तुमचा क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक स्थितीचा सर्वात महत्त्वाचा निर्देशक आहे. क्रेडिट स्कोअर हा तीन-अंकी क्रमांक आहे, जो ३०० ते ९०० पर्यंत असतो आणि त्‍यामधून व्यक्तीच्या कर्जाची परतफेड करण्याची क्षमता दिसून येते. तुमच्या क्रेडिट हिस्‍ट्रीचा काळ, परतफेडीबाबतचे रेकॉर्ड्स आणि इतरांमधील क्रेडिट चौकशी यांसारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन क्रेडिट स्कोअरची गणना केली जाते. हे कर्जदात्‍यांना कर्जदारांच्या प्रोफाइलचे मूल्यांकन करण्यास सक्षम करते. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितके कर्ज मिळवणे आणि व्याजदरांची वाटाघाटी करणे सोपे असते.

भारतात, सर्वात आशादायक कर्ज श्रेणींपैकी एक म्हणजे गृह कर्ज. क्रिफ हाऊ इंडिया लेंड्स २०२१ अहवालाने पुष्‍टी दिली आहे की, आर्थिक वर्ष २०१७ ते आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत एकूण गृहकर्जांच्‍या ओरिजिनेशन्‍समध्‍ये मूल्‍यानुसार ३२ टक्‍क्‍यांची आणि आकारमानानुसार १५ टक्‍क्‍यांनी वाढ झाली. तसेच परवडणाऱ्या गृहकर्जांच्‍या ओरिजिनेशन्‍समध्‍ये मूल्‍यानुसार १७ टक्‍क्‍यांनी आणि आकारमानानुसार ६ टक्‍क्‍यांनी वाढ झाली.

कर्जदारांनो, लक्ष द्या! आता WhatsApp वर मोफत तपासू शकता तुमचा क्रेडिट स्कोर, वाचा संपूर्ण प्रक्रिया
गृहकर्ज मिळवण्‍याकरिता तुमचा क्रेडिट स्‍कोअर सुधारण्‍याचे चार मार्ग पुढीलप्रमाणे:

वेळेवर क्रेडिट परतफेड
देय तारखांना किंवा त्यापूर्वी नियमित पेमेंटची खात्री करा, कारण तुमचा परतफेड रेकॉर्ड तुमचा क्रेडिट स्कोअर ठरवतो. उशीरा किंवा चुकलेली देयके तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम करू शकतात. म्हणून, नियमित पेमेंटचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड ठेवणे उचित आहे, कारण ते एखाद्याच्या ठोस परतफेड क्षमतेचे संकेत म्हणून काम करते.

मर्यादित खर्च करा
अधिकाधिक क्रेडिट कार्ड्स बाळगू नका किंवा क्रेडिट कार्डवर अधिकाधिक खर्च करू नका. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर वारंवार जास्त खर्च करता तेव्हा त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच, तुमची बिले वेळेवर भरण्याची खात्री घ्‍या.

तुम्ही तुमचा CIBIL स्कोर वारंवार तपासता? मग आत्ताच थांबा नाहीतर…
चांगले क्रेडिट मिश्रण
सुरक्षित आणि असुरक्षित कर्जांचे संयोजन तुमचा क्रेडिट स्कोअर वाढविण्यात मदत करेल. यामधून निदर्शनास येते की, कर्जदार म्हणून तुम्ही विविध प्रकारचे कर्ज हाताळण्यास सक्षम आहात.

तुमच्या क्रेडिट अहवालाचा मागोवा ठेवा
अनपेक्षितपणे चुकलेले पेमेंट्स, तुम्हाला चुकीच्या पद्धतीने नियुक्त केलेले कर्ज व कार्ड, ओळखीबाबत फसवणूक किंवा अज्ञात व्यवहार शोधण्यासाठी त्याचे वारंवार निरीक्षण करा. ही उत्तम आर्थिक सवय तुम्हाला वेळेत सुधारात्मक कारवाई करण्यास सक्षम करेल. असे केल्याने, तुम्हाला तुमच्या क्रेडिट अहवालातील विसंगतींची देखील जाणीव होईल आणि विहित प्रक्रियांचे पालन करून त्यांचे निराकरण करू शकता.

क्रेडिट स्‍कोअर्सबाबत अनेक गैरसमज आहेत, ज्‍यासाठी बहुतांश करून निष्‍काळजीपणा किंवा जागरूकतेचा अभाव ही कारणे आहेत. यापैकी काही गैरसमज खालीलप्रमाणे:

चुकीच्या क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज घेण्यात अडचण येतेय; जाणून घ्या तुम्ही काय केले पाहिजे
• क्रेडिट स्कोअर फक्त बँका आणि वित्तीय संस्थांकरिता आवश्यक आहे: क्रेडिट स्कोअर बँका आणि वित्तीय संस्थांना आवश्यक असण्‍यासोबत विमा कंपन्या, दूरसंचार व युटिलिटी कंपन्या आणि काही प्रकरणांमध्ये, संभाव्य नियोक्ते देखील एखाद्या व्यक्तीच्‍या आर्थिक स्थितीचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी क्रेडिट स्‍कोअरचा वापर करतात.

• नियमितपणे क्रेडिट रिपोर्ट तपासल्याने स्कोअर कमी होऊ शकतो: तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासणे ही एक सॉफ्ट चौकशी मानली जाते आणि त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही. आर्थिक स्थितीचा मागोवा घेण्यासाठी तुम्ही तुमच्या क्रेडिट अहवालाचे नियमितपणे निरीक्षण केले पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) द्वारे अनिवार्य केलेल्या प्रत्येक क्रेडिट ब्युरोकडून ग्राहकांना प्रति वर्ष (कॅलेंडर वर्ष) एक विनामूल्य क्रेडिट अहवाल मिळण्याचा हक्क आहे.

• उत्‍पन्‍नाचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो: सर्वसाधारणपणे, तुमची क्रेडिट मर्यादा फक्‍त तुमच्या उत्‍पन्‍नावरून ठरवली जात नाही आणि जास्त पगार म्‍हणजे जास्त क्रेडिट मर्यादा असा अर्थ देखील होत नाही. तुमचे उत्पन्न तुमच्या क्रेडिट अहवालात नोंदवलेले नसल्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे तुमचे उत्‍पन्‍न किती हे महत्त्वाचे नाही.

वर सांगण्‍यात आलेल्‍या पायऱ्यांचे पालन करत उत्तम क्रेडिट हिस्‍ट्री राखण्‍याची खात्री घ्‍या आणि तुमचा क्रेडिट स्‍कोअर वाढवा. प्रबळ क्रेडिट हिस्‍ट्री आणि उत्तम क्रेडिट स्‍कोअर तुम्हाला गृहकर्ज प्रदात्याकडून काही अनुकूल अटींसह गृहकर्जासाठी सहज पात्र ठरवू शकतात.

लेखक – सुभरांगशू चट्टोपाध्याय, संचालक व्यवसाय विकास, क्रिफ हाय मार्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here