मुंबई : रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. संताराम सकपाळ ( वय, 52  ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सकपाळ हा सातारा येथील रहिवासी असून तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो. भारतीय रेल्वे आणि पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने सकपाळ याने 13 लोकांची 1.56 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड  झाले आहे.

संताराम सकपाळ हा त्याच्या इतर चार साथीदारांसोबत भारतीय रेल्वे आणि पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी देतो, असे म्हणून फसणूक करत होते.  हरिश्चंद्र कदम यांनी यासंदर्भात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिस तपास सुरू होता. रविवारी या प्रकरणात सकपाळ याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. सकपाळच्या चौकशीतून या टोळीच्या मुळापर्यंत जाण्यास मदत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सकपाळसह चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि सकपाळ याला बेड्या ठोकल्या. इतर चार जणांचा शोध सुरू आहे. 

सकपाळ याने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने सातारा, लातूरसह इतर जिल्ह्यातील 13 जणांची फसवणूक केली. नियुक्तीपत्रे देऊन एका उमेदवाराला प्रशिक्षणासाठी चेन्नईला पाठवल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही रोख रक्कम सकपाळच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती, त्या आधारे त्याला शोधून अटक करण्यात आली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी एमआरए पोलिस अधिक तपास करत आहेत. 

‘अशी’ करायचे फसवणूक

रल्वेत आणि पोस्टात नोकरी लावण्याच्या आमिषाने सकपाळ आणि त्याचे साथीदार तरूणांकडून पैसे घ्यायचे. रेल्वेतून मेल आल्याचे भासवून रेल्वेची बनावट नोकरीवर हजर होण्याची ऑर्डर द्यायचे. ऑर्डरवर बनावट सही करून, बनावट शिक्क्यांच्या वापर करून ती ऑर्डर खरी असल्याचे भासवून उमेदवारांना देण्यात येत होत्या. अनेक तरूणांना अशा ऑर्डर देखील देण्यात आल्या होत्या. ही ऑर्डर घेऊन काही तरूणांनी सकपाळ याने सांगितल्यानुसार भुसावळ येथे ट्रेनिंग सेंटरला दाखल झाले. परंतु, तेथे गेल्यानंतर ऑर्डर कॉपी बनावट असल्याचे समजताच तरुणांना धक्का बसला. त्यानंतर 13 जणांना चेन्नईला पाठवण्यात आले. तेथे गेल्यानंतर एका रेल्वेचे ट्रेनिंग सेंटर सांगून एका खासगी स्कॅनिंग सेंटरमध्ये एक महिना ट्रेनिंग पूर्ण करण्यास भाग पाडल्याचे फसवणूक झालेल्या तरुणांनी म्हटले आहे.  

news reels reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here