builder cut more than 1000 trees in nagpur, उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात हेरिटजसह १०००हून अधिक झाडांची कत्तल, कुणाला थांगपत्ताही लागला नाही – builder cut more than 1000 trees in nagpur including heritage trees the city of dy cm devendra fadnavis
नागपूर : एकीकडे जगात वृक्षरोपण आणि आणि संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे स्वत:च्या फायद्यासाठी हजारो झाडे कापली जात आहेत. अशीच एक घटना शहरातील नारा परिसरातून समोर आली आहे. येथे एका बांधकाम व्यावसायिकाने (बिल्डर) इमारत बांधण्यासाठी १०००हून अधिक झाडे कापली आहेत. विशेष म्हणजे नागपूर महापालिकेला याची माहितीही नव्हती. एका पर्यावरणप्रेमीच्या तक्रारीनंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात ही घटना घटली आहे.
जेरी प्रॉफिट ग्रुप नावाच्या बिल्डर कंपनीची नारा स्मशानभूमीजवळ ५ एकर जमीन आहे. येथे इमारत बांधण्यासाठी बिल्डरकडून गेल्या दहा ते बारा दिवसांपासून झाडे कापण्यात येत आहेत. आतापर्यंत १०००हून अधिक झाडे कापण्यात आली आहेत. त्याचबरोबर आणखी अनेक झाडे कापण्यात येणार आहेत. नागपूरचे वृक्षमित्र सचिन खोब्रागडे यांच्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. तपासाअंती संबंधितांवर पोलीस तक्रारही करण्यात येणार आहे. अनेक हेरिटेज झाडेही कापली
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महानगर पालिकेच्या उद्यान विभागात एकच खळबळ उडाली आहे. तक्रार मिळाल्यानंतर उद्यान विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या बेकायदेशीर तोडणीत २०हून अधिक हेरिटेज झाडेही कापली गेल्याची पुष्टी त्यांनी केली. त्यासोबतच यात बाभळीच्या झाडांची संख्या सर्वाधिक आहे.
ही माहिती सार्वजनिक झाल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या १० दिवसांपासून एक बांधकाम व्यावसायिक वृक्षतोड करत आहे. मात्र याची माहिती महापालिकेला का नाही? बिल्डर आणि महापालिका कर्मचारी यांच्यात काही मिलीभगत होती का? महापालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही बेकायदेशीर तोडणी सुरू होती का? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. महिला पोलिसावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक; नागपूर लोहमार्ग पोलिसांची कारवाई