नवी दिल्ली: भूतानने पर्यटकाना आकर्षिक करणयासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा भारतातील पर्यटकांना होणार आहे. भूटानला जाणाऱ्या भारतीय नागरिकांना आता ड्यूटी फ्री सोनं खरेदी करता येणार आहे. जे पर्यटक शाश्वत विकास शुल्क (SDF) देतील त्यांना भूटानमधील फुटशोलिंग आणि थिम्पू येथून ड्यूटी फ्री सोनं खरेदी करता येईल.

भूतानला पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे. त्यामुळेच भूतान सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा भारतीय नागरिकांना होणार आहे. भूतानच्या सरकारी वृत्तवत्राने दिलेल्या माहितीनुसार भूतानमधील नव वर्षाच्या (२१ फेब्रुवारी) निमित्ताने हा निर्णय घेतला आहे.

सर्व एसडीएफ देणाऱ्या पर्यटक सोनं खरेदी करण्यासाठी पात्र असतील. यासाठी त्यांना पर्यटन विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या हॉटेलमध्ये किमान एक रात्र तरी थांबावे लागले. एक मार्चपासून थिम्फू आणि फुंटशोलिंग या शहरात सोनं खरेदी करता येईल, असे या वृत्तात म्हटले आहे.

क्रिकेटच्या इतिहासात अशी मॅच झाली नसेल; ६ चेंडू, ४ धावा, जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही
२६ फेब्रुवारी २०२३च्या किमतीनुसार भारतात २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ५८ हजार ३९० रुपये इतकी आहे. तर भूतानमध्ये यासाठी ४० हजार २८६ बीटीएन द्यावे लागतात. एक रुपया आणि एक बीटीएन यांचे मुल्य समानर आहे. ज्यामुळे भारतीय नागरिकांना २४ कॅरेटचे १० ग्रॅम सोने जवळ जवळ ४० हजार २८६ रुपयांना मिळणार आहे.

अर्थात स्वस्तात सोनं खरेदी करायचे असेल तर भारतीय पर्यटकांना शाश्वत विकास शुल्क (Sustainable Development Fee)म्हणून प्रत्येक दिवसाला १ हजार २०० रुपये द्यावे लागतील. पर्यटकांना भूतानच्या पर्यटक विभागाने मंजूरी दिलेल्या हॉटेलमध्ये किमान १ रात्र थांबावे लागले. त्यानंतरच त्यांना सोनं स्वस्तात खरेदी करता येईल.

विकास शुल्क म्हणजे काय?

२०२२ साली भूतानच्या नॅशनल असेंबलीने एक कायदा मंजूर केला. ज्यात भूतानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन कर लागू करण्यात आला. यानुसार प्रत्येक पर्यटकाला हा कर देणे सक्तीचे करण्यात आले. यालाच विकास शुल्क असे म्हटले जाते. भारतीय व्यक्तींना प्रत्येक दिवसासाठी १ हजार २०० रुपये द्यावे लागतात. अन्य देशातील पर्यटकांना ६५ ते २०० डॉलरच्या दरम्यान पैसे मोजावे लागतात.

इंदूर कसोटीत होणार त्रिशतक; भारताच्या स्टार क्रिकेटपटूला करावी लागणार फक्त ही एक गोष्ट…
भारताच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुक्ल बोर्डाच्या सध्याच्या नियमानुसार एक भारतीय पुरुष परदेशातून ५० हजार रुपयांचे सोन (जवळ जवळ २० ग्रॅम) आणू शकतो. तर एक महिला १ लाख (जवळ जवळ ४० ग्रॅम) सोनं आणू शकते. यासाठी कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here