दोन रुपयांच्या चेकवर ८ मार्च तारीख
बार्शी येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण (वय ५८ वर्ष, रा. झाडी बोरगाव, बार्शी, सोलापूर) या शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्डात १७ फेब्रुवारी २०२३ ला जवळपास पाचशे किलो कांदा विकला होता. कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याला प्रतिकिलो १ रुपया प्रमाणे भाव मिळाला. मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करून फक्त दोन रुपये शिल्लक राहिले होते. मार्केट यार्डातील सूर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक शेतकऱ्याच्या दिला होता. चेकवर तारीख देखील ८ मार्च २०२३ दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
‘दोन रुपयांसाठी दादा भुसेंनी मालेगावला या म्हटले’
या प्रकरणी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी माहिती दिली. ‘दोन रुपयांचा चेक वटवण्यासाठी ८ मार्चला जायला जवळपास ३०० रुपये खर्च होत आहे. याबाबत शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री दादा भुसेंना कॉल केला होता. त्यांनी फोनवरून सर्व माहिती ऐकून घेतली. आणि पुन्हा फोन करून मालेगावला या असं उत्तर दिलं आहे. कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. आता राज्य सरकारमधील मंत्रीही थट्टा करत आहेत’, अशी खंत यावेळी शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
कांदा खराब होता, म्हणूनच शेतकऱ्याला फक्त २ रुपये दिले; व्यापाऱ्याचं स्पष्टीकरण