या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी हा घराशेजारीच राहणारा होता. दरम्यान, आई आणि मुलगी दोघेच राहतात. “तुमचं घर मला बघायचे आहे”, असा बहाणा करून संशयित आरोपी प्रितम पाटील याने घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर पीडित मुलीशी बोलत असताना त्याने हात पकडला आणि अत्याचार केला.
यावेळी मुलीने संशयित आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो सोडण्यास तयार नव्हता. मुलगी घराच्या बाहेर दरवाजात उभी राहून आपल्या आईची वाट पाहत असतानाच हा प्रकार घडला. मुलीने आरडा ओरड करून आपली सुटका केली. त्यानंतर काही वेळातच आई आल्यानंतर संपूर्ण घटना आईकडे कथन केल्यानंतर शेजाऱ्यांना विचारपूस केली. मात्र, त्यानंतर पीडित मुलीसह आईवरच प्रश्न केले गेले. यावेळी संतप्त झालेल्या आईने मुलीला घेऊन थेट देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेतली. फिर्याद देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर देवळाली कॅम्प पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जात आहे.