नागपूर : रात्री उशिरा चुलत भावासोबत फिरायला गेलेल्या एका व्यक्तीला भरधाव कारने उडवले. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. फयाज कुरेशी (वय ४३, रा. मोमीनपुरा) असे जखमीचे व्यक्तीचे नाव आहे. तहसील पोलीस ठाणे अंतर्गत ही घटना घडली. दुसरीकडे या संपूर्ण घटनेवर संशय व्यक्त करत नातेवाईकांनी हा खुनी हल्ला असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ४ दिवसांपूर्वी रात्री १२.५५ च्या सुमारास फयाज हा त्याचा चुलत भाऊ मोहम्मद जावेद मोहम्मद शमीम इक्बाल (43, रा. कसाबपुरा) याच्यासोबत सीए रोडवरील हंसापुरी परिसरात फिरायला गेला होता. हे दोघेही अग्रसेन चौकाजवळील मेट्रो स्टेशनच्या खाली जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या कारने फयाजला जोरदार धडक दिली. तो गाडीच्या बोनेटवर तसाच पडून राहिला आणि काही अंतरावर गेल्यानंतर खाली पडला.

धडकेनंतर कार चालक वेगाने पळून गेला. मात्र फयाजचा पाय व खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्यातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. यात तो बेशुद्ध झाला. शमीमने त्याला तातडीने जवळच्या मेयो रुग्णालयात नेले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी फयाजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले. अशा स्थितीत फयाज याला तातडीने धंतोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, शमीमच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.

मुद्दाम धडक दिल्याचा संशय

फयाजचे वडील मोमीनपुरा येथे हॉटेल चालवतात आणि हॉटेल चवलवण्या सोबतच फयाज प्रॉपर्टी डीलिंगही करतो. दुसरीकडे फयाजच्या नातेवाइकांनी अपघातस्थळाजवळच्या काही खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग पाहिले. रेकॉर्डिंगमध्ये शमीम आणि फयाज दोघेही फूटपाथला लागून असलेल्या रस्त्यावरून चालले होते. ते कुठूनही मुख्य रस्त्यावर आहेत, असे म्हणता येणार नाही. अशा स्थितीत भरधाव कार चालकाने फयाजला मुद्दाम धडक दिल्याचा संशय असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात हेरिटजसह १०००हून अधिक झाडांची कत्तल, कुणाला थांगपत्ताही लागला नाही
या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांना गाडीचा क्रमांक मिळाला नसल्याचे फयाजचे नातेवाई म्हणाले. त्याचबरोबर पोलिसांनी त्वरीत कारवाई केल्यास आरोपींचा शोध घेता येईल, असे सांगण्यात म्हटले. घटनेला ४ दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. एक किंवा दुसर्‍या चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कारचा क्रमांक दिसला पाहिजे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई केल्यास आरोपींचा छडा लावता येईल, अशी मागणी फयाझच्या नातेवाईकांनी केली आहे.

Nagpur: नाईक तलावात आढळले महाकाय कासव, वय १०० वर्षांहून अधिक; VIDEO झाला व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here