मुंबई: भारताचा स्टार क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर हे दोघे विवाह बंधनात अडकले आहेत. शार्दुल आणि मिताली यांनी आज सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत मराठी पद्धतीने सात फेरे घेतले. भारतीय क्रिकेट संघातील केएल राहुल, अक्षर पटेल यांच्यानंतर या वर्षी विवाह करणारा शार्दुल हा तिसरा क्रिकेटपूट आहे. शार्दुल आणि मिताली यांच्या विवाहातील पहिले फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत.

शार्दुल आणि मिताली यांचा विवाह धुमधडाक्यात झाला. लग्नाआधी संगीत आणि हळद देखील झाली. या दोन्ही कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर उपस्थित होते. याच बरोबर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि सिद्धेश लाड देखील खास उपस्थित होते.

टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; फक्त २ चेंडूत विजय, विश्वविक्रमात पाहा झालं तरी काय?


संगीत सेरमनीच्या आधी शार्दुल आणि मिताली यांनी पूल पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. शार्दुल-मिताली यांचा नोव्हेंबर २०२१ मध्ये साखरपूडा झाला होता. बऱ्याच वर्षाच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. शार्दुलची पत्नी मतालीचा स्वत:चा व्यवसाय असून तिची एक स्टार्टअप कंपनी आहे.

इंदूर कसोटीत होणार त्रिशतक; भारताच्या स्टार क्रिकेटपटूला करावी लागणार फक्त ही एक गोष्ट…


३१ वर्षीय शार्दुलने भारतासाठी ८ कसोटी, ३४ वनडे आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. शार्दुलने कसोटीत २७, वनडेत ५० तर टी-२० मध्ये ३३ विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजीसोबत अनेक वेळा त्याने फलंदाजीतून संघाच्या विजयात योगदान दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे मालिकेसाठी त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली आहे. आयपीएल २०२३ मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसेल.

IND vs AUS: तुमच्यामुळे इतरांचे नुकसान…; इंदूर कसोटीच्या आधी द्रविड घेणार कठोर निर्णय


शार्दुल- मिताली यांच्या लग्नाचे नियोजन आधी गोव्यात ठरले होते. मात्र काही कारणामुळे ते पुढे ढकलले होते. शार्दुलची पत्नी मिताली सध्या बेकरी कंपनी चालवते. तिने काही काळ मॉडेलिंग केले होते. याशिवाय अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये सेक्रेटरी म्हणूनही काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here