रिपोर्टनुसार, महिलेचा प्रियकर तिच्याकडे शरीर संबंधांसाठी हट्ट करत होता. पण, प्रेयसीला असं काही करायचं नव्हतं. प्रियकराने तिला धमकी दिली की जर तिने शरीर संबंध ठेवले नाहीत तर तो तिचा एमएमएस लीक करेल. ही धमकी ऐकून महिला संतापली आणि रागाच्या भरात तिने थेट प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट छाटून टाकला. या घटनेनंतर प्रियकराला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे प्रेयसीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
हे जोडपं गेल्या ६ महिन्यांपासून एकत्र होतं आणि त्यांच्यात कधीही भांडण झालेलं पाहिलं नाही. दोघेही अत्यंत प्रेमाने एकत्र राहत होते. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी अचानक प्रियकराच्या किंचाळण्याचा आवाज आला. त्यानंतर आसपासचे लोक जमा आले आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे दोघं हॉटेलमध्ये भेटले, तिथे प्रियकराने शरीर संबंधासाठी तिच्यावर बळजबरी केली. तिला ते नको होतं म्हणून तिने नकार दिला. मात्र, प्रियकराने तिला एमएमएस लीक करण्याची धमकी दिली आणि नंतर तो आंघोळीला निघून गेला. त्याचवेळी संधी साधून प्रेयसीने चाकू हाती घेतला आणि थेट त्याचं गुप्तांग कापला. सध्या या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला अटक केली असून सध्या या प्रकरणी कारवाई सुरु आहे.