हैदराबाद : AIMIM चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या व्याह्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादचे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मजरुद्दीन अली खान यांनी सोमवारी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मजरुद्दीन यांनी अशा प्रकारे टोकाचं पाऊल का उचललं, याचा पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खान हे ६० वर्षांचे होते. ते खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दुसऱ्या मुलीचे सासरे होते. त्यांना बंजारा हिल्स इथे राहत्या घरी आत्महत्या केली. घटना घडताच त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. खान यांनी डोक्याच्या उजव्या बाजूला गोळी झाडली. पोलिसांनी त्यांना मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेनासाठी पाठवण्यात आला आहे.

Crime Diary: ८० एन्काऊंटर, अरुण गवळीचे शार्प शूटरही मारले; शहीद विजय साळसकर यांची Unread स्टोरी
डीसीपी जोएल डेव्हिस यांनी सांगितल्यानुसार, खान यांनी मालमत्ता आणि कौटुंबिक वादातून स्वत:वर गोळी झाडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. खान यांच्या बंदुकीचा परवाना होता. पण आत्महत्येसाठी त्यांनी परवाना असलेली बंदूक वापरली होती का? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घरी एकटेच होते डॉ. खान….

खान यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना ४ तासांनी रुग्णालयात नेल्याची माहिती आहे. ते घरी एकटेच होते. त्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे कुटुंबिय घरी भेटायला गेले, तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात सापडले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.

VIDEO : जिममध्ये ११ वा पूशअप्स मारला अन्…; २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा भयंकर अंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here